भारताचा सर्वात मोठा व्यापारी राजपुत्र, ज्याने ब्रिटिशांनाही दिलं होतं मोठं कर्ज, संपत्ती ऐकून व्हाल चकित

Last Updated:

विरजी वोरा 17 व्या शतकातील सर्वात श्रीमंत व्यापारी होते. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला कर्ज दिले आणि मुघल बादशाहला घोडे भेट म्हणून दिले. ते एक दानशूर आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते...

News18
News18
विरजी वोरा यांचा व्यवसाय 1617 ते 1670 या काळात मोठ्या प्रमाणावर फुलला. त्यांच्या यशस्वी व्यवसायामुळे ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे मोठे सावकार बनले. इतकंच नव्हे, तर ऐतिहासिक नोंदी सांगतात की, या गुजराती व्यापाऱ्याने ब्रिटिश व्यापाऱ्यांना तब्बल 2 लाख रुपये कर्ज दिले होते. 17व्या शतकात ही रक्कम खूप मोठी मानली जात होती. वीरजी वोरा यांनी डच आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीलाही कर्ज पुरवलं होतं.
व्यवसायाची मोठी उलाढाल
विरजी वोरा यांचा व्यापारी विस्तार खूप मोठा होता. मसाले, मिरी, सोनं, वेलदोडा यांसारख्या बहुमूल्य वस्तूंच्या व्यापारात त्यांचा मोठा सहभाग होता. खास करून, त्यांची व्यवसाय पद्धती म्हणजे ते संपूर्ण माल खरेदी करत आणि नंतर तो अधिक महाग विकत. या व्यावसायिक युक्तीमुळे त्यांनी लवकरच मोठं नाव कमावलं. विशेष म्हणजे, त्या काळात विरजी वोरा हे संपूर्ण जगातील सर्वांत श्रीमंत व्यापारी होते.
advertisement
विरजी वोरा यांची संपत्ती किती होती?
ईस्ट इंडिया कंपनीच्या नोंदींनुसार, विरजी वोरा हे त्या काळातील सर्वांत मोठे व्यापारी होते. त्यांना ‘व्यापारी राजपुत्र’ असंही म्हटलं जात असे. त्यांच्या संपत्तीचा अंदाज तब्बल 80 लाख रुपये होता. त्या काळात ही रक्कम खूपच प्रचंड मानली जात होती. वीरजी वोरा यांच्या कुटुंबाविषयी फारशी माहिती नाही. मात्र, इतिहासकारांच्या मते ते श्रिमाली ओसवाल पोरवाल समाजाचे होते. धार्मिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असल्याने त्यांना ‘समाजपती’ किंवा ‘संघवी’ ही पदवी देण्यात आली होती. ही पदवी मंदिर बांधणी किंवा मोठ्या यात्रा आयोजित करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींना दिली जात असे.
advertisement
शहाजहानलाही दिली होती भेट!
इतिहासात नोंद आहे की, विरजी वोरा यांनी मुघल बादशाह शहाजहान यांना चार अरबियाई घोड्यांची भेट दिली होती. तसेच, डच आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनींसाठी ते केवळ मोठे सावकारच नव्हे, तर मोठे ग्राहकही होते. वीरजी वोरा यांचा व्यापार आणि संपत्तीची कथा आजही व्यापाराच्या इतिहासात प्रेरणादायी मानली जाते!
advertisement
view comments
मराठी बातम्या/General Knowledge/
भारताचा सर्वात मोठा व्यापारी राजपुत्र, ज्याने ब्रिटिशांनाही दिलं होतं मोठं कर्ज, संपत्ती ऐकून व्हाल चकित
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement