पाणी कधी तयार झालं? महाविस्फोटानंतर किती वर्ष लागले? शास्त्रज्ञांनी केला मोठा खुलासा!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक असलेले पाणी विश्वात कधी तयार झाले, याचा शोध अनेक वर्षांपासून संशोधक घेत आहेत. नवीन संशोधनानुसार बिग बँगनंतर अवघ्या 10-20 दशलक्ष वर्षांत पाण्याची निर्मिती झाली. सुपरनोव्हा...
विश्वात अनेक रहस्ये दडलेली आहेत. विज्ञानप्रेमींच्या मनात विश्वाबद्दल अनेक प्रश्न असतात. त्यापैकीच एक प्रश्न म्हणजे पाणी कधी तयार झालं? शास्त्रज्ञही या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. पाणी पहिल्यांदा कसं आणि कधी तयार झालं, याचा शोध शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून घेत आहेत. आपणा सर्वांना माहीत आहे की, जीवनाच्या वैश्विक उत्पत्तीसाठी पाणी महत्त्वाचं मानलं जातं. अलीकडील मॉडेल्समध्ये असं दिसून आलं आहे की, पाणी धातूंमध्ये मिसळलेल्या वायूंचं बनलेलं असू शकतं. आता याबद्दल एका संशोधनात मोठा खुलासा झाला आहे.
संशोधनात काय उघड झालं?
संशोधनात उघड झालं की, महास्फोटानंतर 10 ते 20 मिलियन वर्षांनी पाणी तयार झालं असावं. संशोधकांच्या मते, पाण्याचं अस्तित्व पूर्वीच्या अंदाजापेक्षा खूप आधीपासून आहे आणि ते पहिल्या आकाशगंगांचा महत्त्वाचा भाग असू शकतं. हे संशोधन नेचर ॲस्ट्रॉनॉमीमध्ये प्रकाशित झालं आहे. अभ्यासात म्हटलं आहे की, संशोधकांनी दोन सुपरनोव्हांचे संगणकीय मॉडेल वापरले, पहिले सूर्याच्या 13 पट वस्तुमान असलेल्या ताऱ्यासाठी आणि दुसरे सूर्याच्या 200 पट वस्तुमान असलेल्या ताऱ्यासाठी. संशोधकांनी या स्फोटांच्या उत्पादनांचं विश्लेषण केलं. अतिशय उच्च तापमान आणि घनता गाठल्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या सिम्युलेशनमध्ये अनुक्रमे 0.051 आणि 55 सौर वस्तुमान (जिथे एक सौर वस्तुमान म्हणजे आपल्या सूर्याचं वस्तुमान) ऑक्सिजन तयार झाल्याचं संशोधकांना आढळलं.
advertisement
पाणी कधी तयार झालं?
संशोधनात पुढे म्हटलं आहे की, जेव्हा हा वायूयुक्त ऑक्सिजन थंड झाला आणि सुपरनोव्हाद्वारे सोडलेल्या सभोवतालच्या हायड्रोजनमध्ये मिसळला, तेव्हा उरलेल्या दाट पदार्थांच्या ढिगाऱ्यांमध्ये पाणी तयार झालं. हे ढिगारे दुसऱ्या पिढीतील तारे आणि ग्रह तयार होण्याची ठिकाणं असू शकतात. संशोधनात असं म्हटलं आहे की, पहिल्या आकाशगंगा तयार होत असताना पाणी टिकून राहिलं असेल, तर ते कोट्यवधी वर्षांपूर्वी ग्रहांच्या निर्मितीतही सहभागी झालं असतं.
advertisement
हे ही वाचा : निसर्गाचा चमत्कार! सरडा नव्हे, तर 'हा' आहे डोंगर जो दिवसभरात बदलतो अनेक रंग! त्यामागचं रहस्य काय?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 25, 2025 5:02 PM IST
मराठी बातम्या/General Knowledge/
पाणी कधी तयार झालं? महाविस्फोटानंतर किती वर्ष लागले? शास्त्रज्ञांनी केला मोठा खुलासा!


