advertisement

Local Accident : अखेरचा प्रवास मित्रासोबत, पण शेवट झाला इतका भयानक; धावत्या लोकलमधून पडून कल्याणच्या तरुणाचा मृत्यू

Last Updated:

Mumbai Local Accident : मित्रासोबत जात असताना तरुणाचा दुर्देवी शेवट झालेला आहे. तरुणाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

20 year old youth dies after falling from Mumbai local train
20 year old youth dies after falling from Mumbai local train
कल्याण : लोकलचा प्रवास हा मुंबईत येणाऱ्या प्रत्येकासाठी नियमितचा झालेला आहे. पण गेल्या काही वर्षात लोकलचा वाढलेल्या अफाट गर्दीमुळे अनेक अपघातही घडत आहेत ज्यात अनेकांचा मृत्यू होतोय. पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आलेली आहे,लोकलमधून पडून 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला
धावत्या लोकलमधून पडून दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, घडलेला हा अपघात कळवा-मुंब्रा डाउन स्लो मार्गावर झालेला आहेत. ज्यात सिराज मुस्तकीम खान (राहणारा कल्याण) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मित्रासोबतचा शेवटचा प्रवास
मिळालेल्या माहितीनुसार, सिराज हा लोकलच्या दरवाजात उभा राहून प्रवास करत होता. ट्रेन वेगात असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. घटनेच्या वेळी त्याच्यासोबत त्याचा मित्रही प्रवास करत होता.
advertisement
अपघाताची माहिती मिळताच ठाणे लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या सिराजला त्वरित सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
दरवाजात उभे राहून प्रवास करताना तोल गेल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून नागरिकांनी लोकलमध्ये सुरक्षितपणे प्रवास करावा असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Local Accident : अखेरचा प्रवास मित्रासोबत, पण शेवट झाला इतका भयानक; धावत्या लोकलमधून पडून कल्याणच्या तरुणाचा मृत्यू
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement