कल्याण-डोंबिवलीसह या 6 शहरांत आता स्वस्तात प्रवास, सरकारचा मोठा निर्णय, लवकरच धावणार..
Last Updated:
Kalyan Dombivli Bus Service : कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांसाठी एकत्रित ई-बस सेवा सुरू होणार आहे. केएमपीएमएलचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याने सर्वेक्षण, बस मार्ग, डेपो आणि कर्मचारी नियोजनाची प्रक्रिया आता वेगाने सुरू होणार आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली सह भिंवडी-उल्हासनगर आणि अंबरनाथ, कुळगाव शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. आता या शहरासाठी एकत्रित परिवहन सेवा चालविली जाणार आहे. या सेवेच्या निमित्ताने स्थापन केलेल्या केएमपीएमएलचे रजिस्ट्रेशन अखेर झाले असून यामुळे एकत्रित परिवहन सेवेसंदर्भातल्या पुढल्या प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.
दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर केएमपीएमएलला मुहूर्त
मोठ्या संख्येने बस रस्त्यावर धावून त्या सेवेला पूरक होतील यात सुलभआणि मुबलक प्रमाणात पॉइंट टू पॉइंट' स्वस्त दरात सेवा मिळेल आणि प्रदूषणाला आळा बसेल, यासाठी सरकारने एकत्रित परिवहन सेवा स्थापन करण्याच्या निर्णयाला 14 मार्च 2024 मध्ये मान्यता दिली होती. पण या सेवेच्या निमित्ताने स्थापन केलेल्या केएमपीएमएलच्या रजिस्ट्रेशनला मुहूर्त मिळत नव्हता. आता अखेर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया नुकतीच पार पडल्याने आता पुढील प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
advertisement
'या' प्रक्रिया आता पार पडणार
कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर शहराचा अपवाद वगळता अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडीत परिवहन सेवा सुरू नाही. त्यामुळे संबंधित शहरांमध्ये ई-बस एकत्रित सेवा चालविण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण पार पडून मार्ग आणि बसथांबे निश्चित करणे, बस टर्मिनल, डेपो उभारणे त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग नेमणे या सर्व यंत्रणेसाठी लागणाऱ्या खर्चाचे नियोजन करणे पुढचा टप्पा आहे.
advertisement
पीएमर्ट योजनेंतर्गत दाखल
view commentsपंधराव्या वित्त आयोगाच्या मंजूर निधीतून केडीएमटी उपक्रमाकडून 207 ई-बस भाडेतत्त्वावर चालवल्या जाणार होत्या, परंतु तीन वर्षांत केवळ 10 ई-बस उपक्रमात दाखल झाल्या आहेत. उर्वरित बस कधी दाखल होतील? होतील की नाही याबाबत साशंकता कायम असताना एकत्रित परिवहन सेवा चालविण्यासाठी कल्याण डोंबिवलीसह भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर अशा प्रत्येक शहरांसाठी पीएमई योजनेअंतर्गत दाखल होणाऱ्या 100 बसचा वापर केला जाणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2025 11:57 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
कल्याण-डोंबिवलीसह या 6 शहरांत आता स्वस्तात प्रवास, सरकारचा मोठा निर्णय, लवकरच धावणार..


