शिंदेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा डंका, निवडणुकीआधी शिवसेनेला मोठा धक्का; विजयी उमेदवारांची यादी समोर

Last Updated:

कल्याण डोंबिवलीत भाजपचे एक-दोन नाही तर तब्बल 15 नगरसेवक उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या पहिल्याच फेरीत निवडून आले आहेत.

News18
News18
कल्याण डोंबिवली : राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहत असून सध्या सर्वाधिक चर्चा ही एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातील कल्याण- डोंबिवली महापालिकेची आहे. कारण या महापालिकेत एक दोन नाही भाजपचे तब्बल 15 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. प्रतिस्पर्ध्यांनी अर्ज मागे घेतल्यानं भाजपच्या उमेदवारांचा विजेतेपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
एकीकडे राज व उद्धव आणि काँग्रेस भाजपा आणि शिवसेनेच्या नावाने टाहो फोडत असताना दुसरीकडे मात्र त्यांचे शिलेदारांनी मैत्री जपून आपल्याच उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावत असल्याचे चित्र दिसत आहे. ज्यामुळे निवडणूक निकाल लांब राहिला प्रचार सुरु होण्याआधीच भाजपचे एक-दोन नाही तर तब्बल 15 नगरसेवक उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या पहिल्याच फेरीत निवडून आलेत. तर शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.
advertisement

कल्याण डोंबिवलीत गेम कसा फिरला? 

सर्वांत महत्वाची भूमिका बजावली असून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा चेहरा किंवा मोठं नेतृत्व कल्याण डोंबिवलीत नसल्याने त्यांच्या उमेदावरांनी वैयक्तिक निर्णय घेत भाजपा शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून दिले आहेत.

  भाजपच्या 15 बिनविरोध उमेदवारांची यादी (KDMC BJP Winning Candidate List) 

advertisement
अ.क्र.प्रभाग (वार्ड) / वर्गउमेदवाराचे पूर्ण नावआरक्षण / प्रवर्ग
1२६ बरंजना मितेश पेणकरसर्वसाधारण महिला
2२६ क आसावरी केदार नवरेसर्वसाधारण महिला
3२७ अ मंदा सुभाष पाटीलओ.बी.सी. महिला
4२४ बज्योती पवन पाटीलसर्वसाधारण महिला
5१८ अ रेखा राजन चौधरीओ.बी.सी. महिला
6२६ अमुकुंद (विशू) बाबाजी पेडणेकरओ.बी.सी.
7२७ ड महेश बाबुराव पाटीलसर्वसाधारण
8१९ क साई शिवाजी शेलारसर्वसाधारण
9२३ अ दिपेश पुंडलिक म्हात्रेओ.बी.सी.
10२३ ड जयेश पुंडलिक म्हात्रेसर्वसाधारण
11२३ क हर्षदा हृदयनाथ भोईरसर्वसाधारण महिला
12१९ बसुनिता बाबुराव पाटीलसर्वसाधारण महिला
13१९ अपूजा योगेश म्हात्रेओ.बी.सी. महिला
14३० अ रविना अमर माळीओ.बी.सी. महिला
15२६ डमंदार श्रीकांत हळबेसर्वसाधारण
advertisement
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या अर्ज छाननीनंतर आता अर्ग मागे घेत राजकीय पक्षांकडून एकमेकांना धक्का दिला जात आहे. आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे, 122 संख्याबळ असलेल्या केडीएमसीमध्ये भाजपचे 15 उमेदवार बिनविरोध करत मोठी आघाडी घेतली असून भाजप समर्थकांचा जल्लोष पाहायला मिळत आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
शिंदेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा डंका, निवडणुकीआधी शिवसेनेला मोठा धक्का; विजयी उमेदवारांची यादी समोर
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement