Kalyan : डिसेंबर एंडचा प्लॅन महागात, कल्याणध्ये 'हॉलिडे स्कॅम'ने खळबळ, 11 जणांना लुटलं, नेमकं काय झालं?

Last Updated:

Kalyan News : हॉलिडे मेंबरशिपच्या आमिषाने कल्याणमधील 11 नागरिकांची सुमारे 13 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित खासगी कंपनीने कार्यालय बंद करून पलायन केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

News18
News18
कल्याण : कल्याण शहर परिसरातील नागरिकांची हॉलिडे मेंबरशिपच्या आमिषाने मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आपणास एक बक्षिस लागले आहे असे सांगून एका खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना कल्याणमधील कार्यालयात बोलावले. तेथे बक्षिसाऐवजी हॉलिडे मेंबरशिपची सुवर्णसंधी असल्याचे सांगत त्यांना पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले.
advertisement
हॉलिडे मेंबरशिपच्या नावाने फसवणूक
संबंधित कंपनीने दहा वर्षांसाठी 2 लाख 95 हजार रुपये भरल्यास भारतात तसेच परदेशात पर्यटन करता येईल, सवलतीत विमान तिकिटे, आलिशान हॉटेल, भोजन व्यवस्था मिळेल असे आमिष दाखवले. या सवलतीच्या योजनेच्या नावाखाली एकूण 11 नागरिकांकडून 12 लाख 94 हजार रुपये उकळण्यात आले. नंतर कंपनीने आपले कार्यालय बंद करून पलायन केल्याचे समोर आले आहे.
advertisement
या प्रकरणी कल्याण पश्चिमेतील वायलेनगर येथे राहणारे दिलीप सावंत यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सावंत यांची 1 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. तसेच इतर दहा नागरिकांची मिळून 11 लाख 74 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये जितेंद्र बागुल, राहुल तुराळे, विक्रांत बागवे, रवी मोटानी, शुभम आळशी, सत्यम चिलुका, रोहित धवले, प्रियंका बरगे, हरिश्चंद्र सावंत आणि ॲग्नेल जॉनी यांचा समावेश आहे.
advertisement
तक्रारीनुसार डिसेंबर 2024 मध्ये दिलीप सावंत यांना कंपनीकडून फोन आला. पत्नीसमवेत ते कल्याणमधील कार्यालयात गेले. तेथे तात्काळ पैसे भरण्यास दबाव टाकण्यात आला. काही रक्कम रोख तर काही क्रेडिट कार्डद्वारे घेतली. करारनामा मागितल्यावर तो ई-मेलने देण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र तसे झाले नाही.
advertisement
नंतर पैसे परत मागितल्यावर कंपनीने टाळाटाळ केली. जुलै 2025 मध्ये कंपनीचे कार्यालय बंद करून कर्मचारी पळून गेल्याचे समजले. याप्रकरणी सेंटारा फॅसिलिटिज अ‍ॅन्ड सेंटर प्रा. लि. आणि त्यांचे संचालक आणि कर्मचारी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan : डिसेंबर एंडचा प्लॅन महागात, कल्याणध्ये 'हॉलिडे स्कॅम'ने खळबळ, 11 जणांना लुटलं, नेमकं काय झालं?
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement