Kalyan News : रेल्वे स्थानकावर अपघातात जखमी, डॉक्टरांनी तपासून डिस्चार्ज दिला, पण घरी गेल्यावर..;कल्याणमध्ये काय घडलं?
Last Updated:
kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकावर लोकलमधून उतरतानाच डेव्हिड घाडगे जखमी झाले. रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचार करून घरी पाठवण्यात आले पण काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीय डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप करत आहेत आणि पोलिस चौकशी करत आहेत.
कल्याण : दिवसेंदिवस लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. असाच एक प्रकार कल्याण रेल्वे स्थानकावर देखील घडलेला आहे. पण दवाखान्यातून उपचार घेऊन आल्यानंतर प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला. नेमकं कल्याणमधील त्या प्रवाशासोबत घडलं काय ते जाणून घेऊयात.
रेल्वेतून पडून काही तासांत मृत्यू...
मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रवाशाचे नाव डेव्हिड घाडगे असून ते कल्याणजवळील आंबिवली परिसरात राहतात. त्या दिवशी ते लोकलमधून उतरताना कल्याण रेल्वेस्थानकात पडले होते त्यामुळे ते जखमी झाले होते. डेव्हिड हे जखमी अवस्थेत असताना त्यांना उपचारासाठी कल्याण स्टेशनजवळी रुक्मिणीबाई हॉस्पिटमध्ये दाखले केले. मात्र, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवले. काही तासांनी घरी पोहचताच डेव्हिड यांचा मृत्यू झाला.
advertisement
या घटनेनंतर कुटुंबीयांनी मृतदेह रुग्णालयात परत आणला असून जोपर्यंत डॉक्टरांवर योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत शवविच्छेदनासाठी देणार नाही आणि मृतदेह ताब्यात ठेवणार असल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे.
रेल्वे अपघातानंतर डॉक्टरांचा निष्काळजीपणा?
डेविड घाडगे यांच्या अचानक मृत्यूने कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे. मृतदेह रुग्णालयात आणल्यावर डेव्हिड यांचा मुलगा तुषार आणि नातेवाईक गौतम मोरे यांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, डॉक्टरांनी जखमी रुग्णाला नीट अॅडमिट करून उपचार केले नाहीत त्यामुळे हा दुर्दैवी मृत्यू झाला.
advertisement
कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कुटुंबीयांना शांत राहण्यास सांगितले असून या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी सांगितले की, नेमके काय प्रकार घडला आहे याचा योग्य तो तपास नक्कीच केला जाईल आणि त्यानंतर योग्य कारवाईसाठी पावले उचलली जातील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 16, 2025 7:43 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News : रेल्वे स्थानकावर अपघातात जखमी, डॉक्टरांनी तपासून डिस्चार्ज दिला, पण घरी गेल्यावर..;कल्याणमध्ये काय घडलं?










