Kalyan News : महिलांची बेशुद्ध करून लूट; इराणी टोळीचा थरारक खेळ संपला, पोलिसांनी कसा लावला छडा?
Last Updated:
Chain Snatching News : आंबिवलीतील इराणी वस्तीत सक्रिय असलेल्या सराईत चोरट्यांना ठाणे शहर पोलिसांनी अटक केली. 52 गुन्हे उघडकीस आले असून 30 लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
कल्याण : गेल्या दोन वर्षापासून कल्याणनजीक असलेल्या आंबिवलीतील इराणी वस्तीत भामट्यांनी कल्याणसह ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर मुंबई,नवी मुंबई आणि थेट कर्नाटक राज्यात चोरीसाठी प्रवेश केला. इराणी चोरट्यांचे चोरीचे मार्ग आज पर्यंत पोलिसांनाही चक्रावून टाकतात.
अखेर ठाणे शहर पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश केला
नुकताच इराणी वस्तीत मुंबईतील पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. आता मात्र या भामट्यांचा धुमाकूळ वाढल्याचे लक्षात येत आहे. बतावणी आणि जबरदस्तीत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोनसाखळ्या लंपास करणाऱ्या सराईत इराणी चोरट्यांना ठाणे शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.
कल्याण-आंबिवली येथील कासिम गरिबशहा इराणी (वय38) आणि मुख्तार शेरू हुसेन उर्फ इराणी (वय32) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ठाणे शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांचा समांतर तपास सुरू असताना, पोलीस अमलदार प्रशांत वानखेडे आणि विनोद चुने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.
advertisement
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या पथकाने कासिम आणि मुख्तार यांना ताब्यात घेतले. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 309(4) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली. चौकशीत ठाणे, मुंबई, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे ग्रामीण परिसर तसेच कर्नाटक राज्यात त्यांनी केलेले 52 गुन्हे उघडकीस आले.
advertisement
आरोपींच्या ताब्यातून 30लाख 06 हजार 750 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींना काही दिवसांसाठी पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील करत आहेत.
कासिमवर 20, मुख्तारवर 14 गुन्हे
कासिम गरिबशहा इराणी याच्याविरोधात ठाणे, नवी मुंबई, पुणे, अहमदनगर, अकोला आणि रायगड जिल्ह्यांमध्ये एकूण 20 गुन्हे दाखल आहेत. तर मुख्तार शेरू हुसेन उर्फ इराणी याच्यावर ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील कोळसेवाडी, मानपाडा, एमएफसी, नौपाडा, कळवा, वर्तकनगर आणि मुंब्रा पोलीस ठाण्यांमध्ये 14 गुन्ह्यांची नोंद आहे.
advertisement
इराणी चोरट्यांचे चोरीचे मार्ग
1. महिला गुंगी आणणारी वस्तू दाखवणे(चार लाख 40 हजार रूपयाहून अधिक किमतीची मेफेड्राॅन (एम. डी.) ही आरोग्याला घातक असणारी गुंगी आणणारी पावडर जप्त केली)
2. सोनसाखळ्या किंवा आपल्याकडील माल महिलांनी किंवा पुरुषांनी दिला नाही तर त्यांना जबरदस्त मारण्याची धमकी देणे
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 2:37 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News : महिलांची बेशुद्ध करून लूट; इराणी टोळीचा थरारक खेळ संपला, पोलिसांनी कसा लावला छडा?









