Kalyan News : कल्याण-डोंबिवलीकरांनो! महापालिकेचा मोठा निर्णय; महिला आणि जेष्ठांना होणार फायदाच फायदा

Last Updated:

Kalyan Dombivli parks : कल्याण-डोंबिवली महापालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे आणि डेकोरेटिव्ह लाईटिंग बसवून उद्याने सुरक्षित केली आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना आता रात्रीही बिनधास्त फेरफटका मारता येणार आहे.

News18
News18
कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील उद्यानात फिरणे नागरिकांसाठी अधिक सुरक्षित होणार आहे. ज्यासाठी महापालिकेने नवा प्लॅन अमलात आणलेला आहे. या प्लॅनमुळे नेमका कोणता बदल करण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीने फायदा होणार ते सविस्तर जाणून घेऊयात.
कल्याण-डोबिंवली शहरातील उद्यानांमध्ये महिलांना किंवा नागरिकांना फेरणे काही प्रमाणात धोक्याचे झालेल होते. कारण या भागात वारंवार गर्दुल्ले, मद्यपी, पाकिटमार, चेन स्नॅचिंगच्या घटना घडत होत्या. त्यामुळे सकाळी फिरायला येणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम असायचे. मात्र याबाबत नागरिकांनी अनेक वेळा महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
अखेर सर्व तक्रारी लक्षात घेऊन आयुक्तांनी तातडीने उद्यानांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले, त्यानुसार महापालिका क्षेत्रात असलेल्या सर्व गार्डन तसेच पार्कमध्ये महापालिकेने एकूण 179 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून यासाठी जवळपास 3 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. एवढेच नाही तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह अनेक उद्यानांमध्ये डेकोरेटिव्ह लाईटिंगही बसवण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळीही उद्याने उजळून निघत असून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांना आता बिनधास्तपणे फिरता येत आहे.
advertisement
ज्या उद्यानांमध्ये कॅमेरे बसवले गेले आहेत ते पुढीलप्रमाणे
शेनाळे तलाव, नाना धर्माधिकारी उद्यान, रमाबाई आंबेडकर उद्यान, रुक्मिणीबाई दवाखाना परिसर (कल्याण), मीनाताई ठाकरे उद्यान, सावित्रीबाई फुले रंगमंदिर, क्रीडासंकुल, तरण तलाव, आनंदनगर उद्यान आणि भागशाळा मैदान (डोंबिवली).
ज्या ठिकाणी डेकोरेटिव्ह लाईटिंग बसवण्यात आली 
कारभारी उद्यान, धर्मवीर आनंद दिघे उद्यान, नाना धर्माधिकारी उद्यान, चौधरी मोहल्ला उद्यान (कल्याण) आणि सावरकर उद्यान (डोंबिवली). महापालिकेने केलेल्या या कामांमुळे उद्याने सुरक्षित आणि आकर्षक बनली असून नागरिकांना आता भीती न बाळगता मनोरंजनाचा आनंद घेता येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News : कल्याण-डोंबिवलीकरांनो! महापालिकेचा मोठा निर्णय; महिला आणि जेष्ठांना होणार फायदाच फायदा
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement