Ulhasnagar Crime : बापरे! मोबाईलवर आलेल्या एका कॉलनं उद्ध्वस्त केलं आयुष्य, वृद्ध महिलेसोबत भयंकर घडलं

Last Updated:

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये सेवानिवृत्त महिला व्हॉट्सअॅपवर डिजिटल अरेस्टची धमकी देऊन 60 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक झाली. बनावट पोलिस ओळखपत्रे, सरकारी नोटीस आणि व्हॉट्सअॅप स्टेटस वापरून या टोळक्याने आर्थिक घोटाळा केला.

News18
News18
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील सेवानिवृत्त वृद्ध महिला विद्य्या रामानी यांना डिजिटल अरेस्टची भिती दाखवत एका टोळक्याने तब्बल 60 लाख 20 हजार रुपयांनी फसवल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फसवणुकीचा नवा फॉर्म्युला
घटना अशी की गेल्या महिन्यात रामानी यांना व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तींनी स्वतःची नावे रिया शर्मा, प्रदीप जैस्वाल आणि विश्वास पाटील अशी सांगितली. त्या टोळक्याने व्हॉट्सअॅपवर पोलिसांचा स्टेटस ठेवला होता, ज्यामुळे ते खरे अधिकारी असल्याचा विश्वास त्यांना निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी बनावट पोलिस ओळखपत्रे, अधिकृत कागदपत्रे आणि सरकारी शिक्के असलेली फाईल पाठवून स्वतःला पोलिस, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी, रिझर्व्ह बँक आणि ईडीचे प्रतिनिधी असल्याचे भासवले.
advertisement
या कागदपत्रांमध्ये बनावट नोटीस, समन्स आणि चौकशी आदेश यांचा समावेश होता. सर्व कागदपत्रे पाहून रामानी घाबरल्या. आरोपींनी सांगितले की त्यांच्या नावावर गंभीर गुन्ह्याची शंका आहे आणि त्यांना कधीही डिजिटल अटक होऊ शकते. या भीतीचा फायदा घेत त्यांनी रामानी यांना व्हेरिफिकेशनच्या नावाखाली आर्थिक माहिती मागितली.
पुढील काही दिवस आरोपींनी वारंवार कॉल करून त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यांतून पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. विश्वास बसावा म्हणून ते प्रत्येकवेळी नवीन बनावट नोटीस किंवा सरकारी पत्र पाठवत होते. या दडपणाखाली रामानी यांनी एकूण 60 लाख 20 हजार रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा केले.
advertisement
काही दिवसांनी कोणतीही सरकारी प्रक्रिया न सुरू झाल्याने आणि संपर्क क्रमांकही बंद आढळल्याने त्यांना फसवणुकीची जाणीव झाली. तत्काळ त्या उल्हासनगर पोलिस ठाण्यात पोहोचल्या आणि संपूर्ण घटना नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Ulhasnagar Crime : बापरे! मोबाईलवर आलेल्या एका कॉलनं उद्ध्वस्त केलं आयुष्य, वृद्ध महिलेसोबत भयंकर घडलं
Next Article
advertisement
Eknath Shinde Uddhav Thackeray: कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, मातोश्रीवर 'घरवापसी'च्या हालचाली!
कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार
  • कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार

  • कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार

  • कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार

View All
advertisement