advertisement

KDMC Sanitation Workers: मन मोठं असावं लागतं! कचऱ्यात चुकून गेलेले सोन्याचे कानातले KDMC सफाई कर्मचाऱ्याने महिलेला केले परत

Last Updated:

कल्याण पूर्वेतील एका महिलेच्या कानातील हरवले होते. जे तिला सफाई कामगारांनी पुन्हा मिळवून दिले आहेत. एका महिलेचे चुकून कचऱ्यामध्ये गेलेले सोन्याचे कानातलेसफाई कामगारांनी पुन्हा मिळवून दिले आहेत.

KDMC Sanitation Workers: मन मोठं असावं लागतं! कचऱ्यात चुकून गेलेले सोन्याचे कानातले KDMC सफाई कर्मचाऱ्याने महिलेला केले परत
KDMC Sanitation Workers: मन मोठं असावं लागतं! कचऱ्यात चुकून गेलेले सोन्याचे कानातले KDMC सफाई कर्मचाऱ्याने महिलेला केले परत
सोन्याच्या किंमती दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहेत. सध्या सोन्याने लाखाचा टप्पा पार केला असून सामान्य नागरिकांना सोन्याच्या वस्तू खरेदी करताना नाकी नऊ येतं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्वे एका महिलेकडून चुकून कचऱ्यासोबत सोन्याचा हार फेकल्याची घटना घडली होती. मात्र केडीएमसीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी कोणत्याही मोहाला बळी न पडता तो सोन्याचा हार संबंधित महिलेला परत मिळवून दिला. त्यामुळे त्या सफाई कर्मचाऱ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात होते.
आता अशातच या घटनेनंतर कल्याण पूर्वेत अलीकडेच पुन्हा एकदा अशी घटना घडली आहे. यावेळी कल्याण पूर्वेतील एका महिलेच्या कानातील हरवले होते. जे तिला सफाई कामगारांनी पुन्हा मिळवून दिले आहेत. एका महिलेचे चुकून कचऱ्यामध्ये गेलेले सोन्याचे कानातलेसफाई कामगारांनी पुन्हा मिळवून दिले आहेत.. त्यामुळे त्या सफाई कामगारांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहेत.
advertisement
कल्याण पूर्वेतील 'ड' प्रभाग क्षेत्र कार्यालयाजवळील पुना लिंक रोडवर जय शिव सह्याद्री हौसिंग सोसायटी नावाची एक चाळ आहे. या परिसरातून केडीएमसी सुमित एल्कोप्लास्टच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे कचऱ्याचे संकलन केले. त्यावेळी या चाळीमध्ये राहणाऱ्या अंकिता अनिल मोरे यांचे जवळपास एक तोळ्याचे लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे कानातले नजरचुकीने कचऱ्याच्या डब्ब्यात टाकले गेले. मात्र ही बाब त्यांच्या लक्षात येईपर्यंत एक तास उलटून गेला होता. त्यानंतर अंकिता यांनी सुमित कंपनीचे सुपरवायझर भूषण सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.
advertisement
घडलेला प्रकार सांगितल्यानंतर सूर्यवंशी यांनी ताबडतोब त्यांच्या परिसरात जी कचऱ्याची गाडी कचरा गोळा करते, तिचे ठिकाण शोधले. ही गाडी त्याच परिसरातील नूतन ज्ञान मंदिर शाळेजवळच कचरा संकलनाचे काम करत होती. सूर्यवंशी यांनी लगेचच मोरे यांना त्याठिकाणी बोलावून घेतले. घंटागाडीसोबत उपस्थित असलेल्या विनोद बेलीलकर, चैतन्य वाजे, सुनील तेलम या तीनही कर्मचार्‍यांनी गाडीतील सर्व कचरा तिकडेच रस्त्याच्या एका बाजूला उतरवला. त्यानंतर अंकिता मोरे यांच्या उपस्थितीत कचऱ्यातील प्रत्येक पिशवी आणि कागदाची पुडी त्यांनी तपासून पहिली.
advertisement
तब्बल एक तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर मोरे यांचे कानातले ज्यात होते ती पिशवी सापडली. यावेळी केडीएमसीचे स्वच्छता निरीक्षक अमित भालेराव आणि सुमित एल्कोप्लास्ट कंपनीचे युनिट ऑफिसर समीर खाडे हे सुद्धा उपस्थित होते. अंकिता मोरे यांनी सांगितले की, "मी इयत्ता सातव्या इयत्तेमध्ये असताना माझ्या आई बाबांनी खास माझ्यासाठी हे सोन्याचे कानातले केले होते. मा‍झ्या लग्नाला सत्तावीस वर्षे झाली असून हे केवळ कानातले नाही तर माझ्या आई-वडिलांची आठवण आहे. मोरे यांचा वाढदिवस असल्याने हा दिवस त्यांच्यासाठी अतिशय खासच ठरला."
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
KDMC Sanitation Workers: मन मोठं असावं लागतं! कचऱ्यात चुकून गेलेले सोन्याचे कानातले KDMC सफाई कर्मचाऱ्याने महिलेला केले परत
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement