श्रीकांत शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा धमाका, निवडणुकीत पहिला विजय, उद्धव ठाकरेंचा थेट फोन

Last Updated:

आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरें गटाने विजय मिळवला आहे.

News18
News18
डोंबिवली : स्थानिक स्वराज्य निवडणुकीची वारे वाहू लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरें गटाने विजय मिळवला आहे. स्थानिक संस्था निवडणुकीत ठाकरे गटाने पहिला विजय मिळवला आहे.
डोंबिवली जवळील खोणी ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी ज्योती विश्वास जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. ज्योती विश्वास जाधव या ठाकरे गटाच्या पुरस्कृत उमेदवार होत्या. जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी  सरपंचपदी निवड झालेल्या ज्योती विश्वास जाधव यांचं सत्कार केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील खोणी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ज्योती विश्वास जाधव ह्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. भ्रमणध्वनीद्वारे त्यांचं अभिनंदन करत पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा अभिनंदनपर कार्यक्रम देखील पार पडला.
advertisement
सदर निवडणुकीत शिवसेनेच्या संघटित कार्यप्रणालीमुळे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या बळावर खोणी ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा अभिमानाने फडकला आहे. हा विजय म्हणजे पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ असल्याचे मानले जात आहे.
हा विजय म्हणजे जनतेच्या विश्वासाचा आणि पक्षाच्या संघटनेच्या बळाचा विजय आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष जनतेच्या हितासाठी आणि विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील, असा निर्धार यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.
advertisement
मनसेचे नेते राजू पाटील यांची पडद्याआड महत्त्वाची भूमिका
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेशदादा पाटील यांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली होती, अशी प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिली.
ठाकरे गटाकडून हा अपप्रचार - शिंदे गटाची प्रतिक्रिया
दरम्यान, डोंबिवली : खोणी गाव सरपंच निवडणूक झाली. ज्योती जाधव विजयी झाल्या. पण, श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने हा निर्णय घेतला. त्यांना सरपंचपदी बसवण्याचा निर्णय घेतला. पण काही लोक अप्रचार करत आहे आणि उद्धव ठाकरे यांचे नाव देत आहे, अशी प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख महेश पाटील यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
श्रीकांत शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा धमाका, निवडणुकीत पहिला विजय, उद्धव ठाकरेंचा थेट फोन
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement