Badlapur News : चुकलेल्या एका पावलाने आयुष्य संपवले; गडावरून कोसळून तरुण गिर्यारोहकाचा मृत्यू

Last Updated:

Chanderi Fort Badlapur : चंदेरी गडावर ट्रेकिंग करताना रोहित गुप्ताचा पाय घसरला आणि तो सुमारे 500- 600 फूट खोल दरीत कोसळला. रेस्क्यू टीमने 24 तासांच्या शोधानंतर मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढला.

News18
News18
बदलापूर : बदलापूरजवळील ऐतिहासिक चंदेरी गडावर मित्रासोबत ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका तरुणाचा पाय घसरून सुमारे 500-600 फूट खोल दरीत कोसळल्याने मृत्यू झाला. या अपघाताची घटना 1 जानेवारीला घडली,ज्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एका चुकीच्या पावलामुळे युवकाने जीव गमावला
रोहित गुप्ता जो टिटवाळा येथील रहिवासी होता तो आणि त्याचा मित्र अजय पंडम 1 जानेवारीला चंदेरी गडावर ट्रेकिंगसाठी गेले होते. दोघांनी गड पूर्ण चढला पण परतीच्या मार्गावर अचानक रोहितचा पाय घसरला. त्याचा पाय घसरत सुमारे 500 ते 600 फूट खोल दरीत तो कोसळला. अपघात इतका भयंकर होता की घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच बदलापूर आणि लोणावळा येथील रेस्क्यू टीम, स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले. दाट जंगल, खोल दरी आणि अवघड परिस्थितीमुळे शोधकार्य खूप कठीण झाले. 24 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रोहितचा मृतदेह दरीत आढळला. रेस्क्यू टीमने सुरक्षेचे सर्व उपाय करून त्याचा मृतदेह गडाखालील सुरक्षित ठिकाणी आणला.
ही मोहीम अत्यंत धोकादायक आणि आव्हानात्मक होती. स्थानिक लोकांनी आणि ट्रेकर्सनी या घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे. या घटनेतून ट्रेकिंग करताना सुरक्षा आणि काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Badlapur News : चुकलेल्या एका पावलाने आयुष्य संपवले; गडावरून कोसळून तरुण गिर्यारोहकाचा मृत्यू
Next Article
advertisement
US Attack Venezuela Gold Price: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदाजाने गुंतवणूकदारांची झोप उडणार!
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदा
  • अमेरिकेने व्हेनेझुएला देशावर हल्ला करत राष्ट्रपती मादुरो यांना अटक केली.

  • व्हेनेझुएला हा देश सर्वाधिक तेल उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक

  • अमेरिकेच्या हल्ल्याचे परिणाम बाजारावरही होणार असल्याचे संकेत

View All
advertisement