Crime News : चिपळूणमध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर, निर्जन स्थळी आढळली बेशुद्धावस्थेत
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
चिपळूण, 16 डिसेंबर : चिपळूणमध्ये एका हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोकरे गावात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकारानंतर नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलगी दहावीमध्ये शिकत आहे. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिला निर्जन ठिकाणी बेशुद्धावस्थेत सोडण्यात आलं. पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सावर्डे पोलिसांनी दोघांना अटक केलीय.
गेल्या महिन्यातसुद्धा चिपळूणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. एका १४ वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार करण्यात आला होता. भातशेती असलेल्या व्यक्तीने पत्नीला भात कापण्यासाठी शेतात पाठवले आणि आपण घरीच थांबला होता. तेव्हा पत्नीला संशय आला आणि ती घरी परतली तेव्हा धक्कादायक प्रकार उघड झाला. पती आणि अल्पवयीन मुलगी आक्षेपार्ह स्थितीत आढळले होते. यानंतर पीडित मुलीसोबत संबंधित व्यक्तीने चार ते पाच वेळा शरीरसंबंध ठेवल्याचं कबूल केलं होतं. त्याच्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2023 9:25 AM IST
मराठी बातम्या/कोकण/
Crime News : चिपळूणमध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर, निर्जन स्थळी आढळली बेशुद्धावस्थेत