मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, तीन दिवस 'या' वेळेत वाहतूक बंद
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने राष्ट्रीय महामार्गाकडे या पुलाच्या कामाचे गर्डर बसविण्याकरीता चक्क महामार्गा बंद ठेवण्याचा अर्ज केलाय.
प्रमोद पाटील, रायगड : गेली कित्येक वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग अद्यापही खडतर अवस्थेत आहे. मुंबई गोवा महामार्गावर अनेक भागात फ्लायओवर पुलांची कामे सुरू आहेत. यामुळे ऐन पावसाळ्यात आता आगामी काळामध्ये येऊन ठेपणाऱ्या गणपती उत्सवामध्ये अनेक पुलांची काम पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या. आता याच कामासाठी तीन दिवस सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळेत महामार्ग बंद ठेवला जाणार आहे. यामुळे प्रवाशांना यावेळेत अडचणींचा सामना करावा लागू शकते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई गोवा महामार्गावरील पुई येथील मे कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने राष्ट्रीय महामार्गाकडे या पुलाच्या कामाचे गर्डर बसविण्याकरीता चक्क महामार्गा बंद ठेवण्याचा अर्ज केलाय. त्यामुळे वाहतूक 11 ते 13 जुलै या कालावधीत दोन तासांसाठी टप्प्या टप्प्याने महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जाईल.
मुंबई गोवा महामार्ग 11 जुलैला सकाळी 6 ते 8 या वेळेत आणि दुपारी 2 ते 4 वेळेत बंद राहील. तर 12 जुलैला सकाळी 6 ते 8 या वेळेत आणि दुपारी 2 ते 4 वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. याशिवाय 13 जुलैलासुद्धा सकाळी 6 ते 8 या वेळेत आणि दुपारी 2 ते 4 या वेळेत महामार्ग बंद राहणार आहे. या वेळेत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन संबधित विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 10, 2024 10:15 AM IST
मराठी बातम्या/कोकण/
मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, तीन दिवस 'या' वेळेत वाहतूक बंद


