Raigad : हरिहरेश्वरमध्ये रूमच्या भाड्यावरून वाद, पर्यटकांनी रिसॉर्ट मालकाच्या बहिणीला स्कॉर्पिओखाली चिरडलं
- Published by:Suraj
Last Updated:
दारुच्या नशेत महिलेच्या अंगावर गाडी घालून चिरडल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. रायगडमधील हरिहरेश्वर परिसरात हा प्रकार घडलाय.
रायगड : पुण्यातून कोकणात फिरायला गेलेल्या पर्यटकांकडून मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला आहे. दारुच्या नशेत महिलेच्या अंगावर गाडी घालून चिरडल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. रायगडमधील हरिहरेश्वर परिसरात हा प्रकार घडलाय. दारुच्या नशेत पर्यटकांनी हॉटेल मालकाला मारहाण केली. यानंतर महिलेच्या अंगावर स्कॉर्पिओ घातली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हरिहरेश्वर परिसरात फिरण्यासाठी आलेले पुण्यातील पर्यटक हरिहरेश्वर येथील हॉटेल ममता यांचे मालक अभी धामणस्कर त्यांच्या हॉटेलमध्ये रूमसाठी विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांच्याशी रूमचा रेट संदर्भात वाद झाला. दारूच्या नशेत असलेल्या पर्यटकांनी यावेळी हॉटेल व्यवसायिक अभी धामणस्कर यांना मारहाण केली.
advertisement
पर्यटक एवढ्यावरच न थांबता अभी धामणस्कर यांची बहीण ज्योती धामणस्कर हिला स्कॉर्पिओ खाली चिरडल्याची घटना घडली. यानंतर या पर्यटकांनी इथून पळ काढल्याची बाब समोर आली आहे. श्रीवर्धन मधील पोलीस या आरोपींचा आता शोध घेत आहेत. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसर हादरून गेला आहे.
रायगड येथील हरिहरेश्वर हिट अँड रन प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण आरोपींची संख्या ११ इतकी आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आलीय. यातील एकाला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं तर दोघांना मोबाईल लोकेशनच्या आधारे श्रीवर्धन स्टँडमधून अटक करण्यात आली. उर्वरित आऱोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक पुण्याला रवाना झाले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 20, 2024 10:02 AM IST
मराठी बातम्या/कोकण/
Raigad : हरिहरेश्वरमध्ये रूमच्या भाड्यावरून वाद, पर्यटकांनी रिसॉर्ट मालकाच्या बहिणीला स्कॉर्पिओखाली चिरडलं


