BP Control Tips: तुम्हाला आहे हाय ब्लडप्रेशरचा त्रास? करा ‘हे’ साधे उपाय, ब्लडप्रेशर राहील नियंत्रणात
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Tips to control BP naturally: बदलती जीवनशैली, जंकफूडचं अतिसेवन, सततचा ताणतणाव, व्यायाम न करणं अशा अनेक कारणांमुळे हायब्लडप्रेशरचा त्रास वाढू लागयाय. त्यामुळे वेळीच निदान आणि उपचार न झाल्यामुळे अनेकांना हृदयविकार, पॅरेलिसीस, ब्रेन स्ट्रोक अशा आजारांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हालाही रक्तदाबाचा त्रास असेल तर आम्ही सांगतो हे साधे घरगुती उपाय करून पाहा, जेणेकरून तुमचा हायब्लडप्रेशरचा त्रास दूर होऊ शकेल.
मुंबई : एकेकाळी म्हातारपणी होणारा हायब्लडप्रेशरचा त्रास अनेकांना तरूणपणातच होऊ लागलाय. बदलती जीवनशैली, जंकफूडचं अतिसेवन, सततचा ताणतणाव, व्यायाम न करणं अशा अनेक कारणांमुळे हायब्लडप्रेशरचा त्रास वाढू लागयाय. जेव्हा हा त्रास सुरू होतो तेव्हा त्याची लक्षणं सहजपणे दिसून येत नाही. त्यामुळे वेळीच निदान आणि उपचार न झाल्यामुळे अनेकांना हृदयविकार, पॅरेलिसीस, ब्रेन स्ट्रोक अशा आजारांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हालाही रक्तदाबाचा त्रास असेल तर आम्ही सांगतो हे साधे घरगुती उपाय करून पाहा, जेणेकरून तुमचा हायब्लडप्रेशरचा त्रास दूर होऊ शकेल.
जाणून घेऊयात उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे 5 साधे आणि सोपे उपाय.
1) व्यायाम
तज्ज्ञांच्या मते, एका जागी जास्त वेळ बसल्याने वजन वाढू शकतं. यासोबत शरीराला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामाची सवय लावून घ्या. याशिवाय तुम्हाला ऑफिसमध्ये बसून काम करावं लागत असेल तर ठराविक वेळेनंतर ब्रेक घ्या. लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर करा.
advertisement

2) ताण व्यवस्थापन
तणावाचा थेट परिणाम तुमच्या रक्तदाबावर होतो. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा तुमच्या शरीरात ॲड्रेनालाईन आणि कॉर्टिसॉल सारखे हार्मोन्स सोडले जातात. ज्यामुळे व्यक्तीच्या हृदयाची गती वाढते. रक्तदाब वाढून आणि रक्तवाहिन्या अरुंद होतात. ज्यामुळे हृदयरोग, पक्षाघात आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी व्यायाम, ध्यान किंवा दीर्घ श्वासोच्छवासारखे व्यायाम करा. ज्यामुळे रक्तदाबाची नियंत्रणात राहायला मदत होईल.
advertisement
3) निरोगी आहार
उच्च रक्तदाबाचं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे चुकीचा आहार किंवा जंक फूड. आजकाल अनेक जण रेडी टू इट फूड, किंवा जंक फूड खातात. हे अन्नपदार्थ आरोग्यासाठी चांगले नाहीत. अशा प्रकारच्या अन्नामध्ये साखर आणि सोडियमचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमच्या आहारात हिरव्या भाज्या, धान्य, फळे आणि दुग्धजन्य पदार्थ यांसारख्या आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा. जेणेकरून तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहील.
advertisement
4) चांगली झोप
अपुरी झोप किंवा रात्री उशीरापर्यंत जागण्याची सवय वजन आणि रक्तदाब वाढण्यास कारणीभूत ठरते. लक्षात घ्या, झोपेमुळे तुमच्या शरीराला विश्रांती मिळते आणि तुमच्या शरीराची झालेली झीज भरून यायला मदत होते. पुरेशी झोप न झाल्यामुळे डोकेदुखी, थकवा असे आजार वाढतात, ज्यामुळे रक्तदाबाची शक्यताही वाढते. त्यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेशी आणि चांगली झोप घ्या.
advertisement
5) लठ्ठपणा
अनेकदा वाढलेलं जास्त वजन आणि लठ्ठपणामुळे देखील हाय ब्लडप्रेशरचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे वाढतं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवा, ज्यामुळे तुमचा रक्तदाब आपसूकच नियंत्रणात राहील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 29, 2025 4:11 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
BP Control Tips: तुम्हाला आहे हाय ब्लडप्रेशरचा त्रास? करा ‘हे’ साधे उपाय, ब्लडप्रेशर राहील नियंत्रणात