छातीतली जळजळ साधीसुधी समजू नका, हा असू शकतो Heart attack किंवा Cancer!

Last Updated:

काही वेळ जळजळ होईल आणि मग बरं वाटेल, असं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा त्यावर काही तात्पुरते उपाय करतो. मात्र हाच हलगर्जीपणा आपल्याला कधी महागात पडेल हे कळणारसुद्धा नाही.

याकडे कधीच दुर्लक्ष करू नका.
याकडे कधीच दुर्लक्ष करू नका.
शाश्वत सिंह, प्रतिनिधी
झाँसी : छातीत जळजळ होणं ही आजकाल जवळपास प्रत्येक व्यक्तीची समस्या झाली आहे. आपल्या खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयींमुळे हा त्रास सर्वांनाच होतो. परंतु काही वेळ जळजळ होईल आणि मग बरं वाटेल, असं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा त्यावर काही तात्पुरते उपाय करतो. मात्र हाच हलगर्जीपणा आपल्याला कधी महागात पडेल हे कळणारसुद्धा नाही.
advertisement
छातीतली जळजळ हा अनेकदा एखाद्या गंभीर आजाराचा संकेत असतो. कदाचित हा भविष्यात येणाऱ्या हार्ट अटॅकचा किंवा होणाऱ्या कर्करोगाचाही संकेत असू शकतो. त्यामुळे त्याकडे कधीच दुर्लक्ष करू नये.
उत्तर प्रदेशच्या झाँसी भागातील चेस्ट स्पेशलिस्ट डॉ. डी एस गुप्ता सांगतात की, जर कोणाला तासन्-तास छातीत जळजळ होत असेल, त्यामुळे काही खायला किंवा प्यायला त्रास होत असेल, छातीत दुखत असेल, तसंच अचानक वजन कमी झालेलं दिसलं, खूप वाईटरित्या घसा बसला तर हे धोक्याचं आहे. कधीकधी हृदयात आलेली कळ खांद्यापर्यंत पोहोचते. हा हार्ट अटॅकचा धोका असू शकतो. त्यामुळे साधी acidity असली तरी त्यावर कधीच घरच्या घरी उपाय करू नये. कोणतंही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
advertisement
शिवाय हार्टबर्न हे अनेकदा पोटाचा किंवा आतड्यांचा कर्करोग दर्शवतं. आतड्यांमध्ये वाहणाऱ्या ॲसिडमुळे बऱ्याचदा टिश्यू डॅमेज होतात. त्यामुळे हार्निया आणि अल्सरसारखे आजारही होऊ शकतात. म्हणून छातीत जळजळ, मळमळ झाल्यास किंवा उलटीसारखं वाटल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावं. त्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या एका मोठ्या रोगापासून आपलं संरक्षण होऊ शकतं.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
छातीतली जळजळ साधीसुधी समजू नका, हा असू शकतो Heart attack किंवा Cancer!
Next Article
advertisement
BJP Eknath Shinde : मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र
मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र
  • मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र

  • मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र

  • मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र

View All
advertisement