Hair Care : रेशमी मुलायम केसांसाठी हा उपाय करुन पाहा, आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सांगितलेल्या उपायानं केस गळणंही होईल कमी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
रेशमी केस एकूण सौंदर्यात भर घालतात. काहींचे केस नैसर्गिकरित्या मऊ आणि गुळगुळीत असतात, तर काहींना केस सुंदर ठेवण्यासाठी महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करावा लागतो. पण याचे परिणाम जास्त काळ टिकत नाहीत. यासाठी काही घरगुती उपायांची मदत होते.
मुंबई : तुम्ही कसे दिसता हे व्यक्तिमत्वाबरोबरच तुमच्या केशरचनेवरही अवलंबून असतं. केस जर दाट आणि मजबूत असतील तर तुम्ही उठून दिसता.
रेशमी केस एकूण सौंदर्यात भर घालतात. काहींचे केस नैसर्गिकरित्या मऊ आणि गुळगुळीत असतात, तर काहींना केस तसे दिसण्यासाठी महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करावा लागतो. पण याचे परिणाम जास्त काळ टिकत नाहीत. यासाठी काही घरगुती उपायांची मदत होते.
प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर शोभना यांनी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. या घरगुती आयुर्वेदिक उपायामुळे, केस मजबूत, गुळगुळीत आणि रेशमी होऊ शकतील. यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि केस गळण्याचं प्रमाण कमी होतं.
advertisement
आयुर्वेदिक हेअर मास्क बनवण्यासाठी आवश्यक साहित्य:
जवस, मक्याचं पीठ, नारळाचं तेल, ऑलिव्ह ऑइल - हा हेअर मास्क बनवणं खूप सोपं आहे. हे करण्यासाठी, एका भांड्यात एक ग्लास पाणी घाला त्यात तीन चमचे जवस घाला, हे मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत उकळवा आणि नंतर गाळून घ्या. यानंतर, एक ग्लास पाण्यात दोन चमचे कॉर्न फ्लोअर घालून गुळगुळीत पेस्ट होईपर्यंत उकळवा.
advertisement
आता त्यात आधी तयार केलेलं जवसाच्या बियांचं जेल, दोन चमचे नारळाचं तेल आणि एक चमचा ऑलिव्ह ऑइल घाला. हे मिश्रण नीट मिसळा आणि हेअर मास्क तयार आहे.
हा हेअर मास्क नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतो. केसांना व्यवस्थित लावा आणि चाळीस मिनिटांनी धुवा. आठवड्यातून एकदा हे वापरल्यानं केस गळणं कमी होईल. यामुळे केसांची वाढ चांगली होते. हा हेअर मास्क वापरल्यानं पहिल्याच वापरात चांगला बदल दिसू शकेल. कुठल्याही प्रकारची अॅलर्जी असेल तर आधी पॅच टेस्ट करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 15, 2025 6:39 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Care : रेशमी मुलायम केसांसाठी हा उपाय करुन पाहा, आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सांगितलेल्या उपायानं केस गळणंही होईल कमी










