Lip Balm : थंडीत राहतील ओठ गुलाबी आणि मऊ, जाणून घ्या घरी लिप बाम बनवण्याची कृती
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
बाजारातल्या लिप बाममधल्या रासायनिक घटकांमुळे, ओठ काळे होऊ शकतात. अशावेळी, घरगुती उपचार खूप परिणामकारक ठरतात. या वापरानं फाटलेले ओठ मऊ होतील आणि गुलाबी राहतील. गुलाबाची पाकळी आणि मिल्क लिप बाम, हळद आणि दूध, कोरफड, साखर आणि नारळ तेल स्क्रब या नैसर्गिक पर्यायांचा वापर नक्की करुन बघा.
मुंबई : हिवाळ्यात त्वचेच्या समस्यांचं प्रमाण वाढतं. थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे त्वचेतला ओलावा कमी होतो आणि त्वचा कोरडी होते. हिवाळ्यात अनेकदा थंड हवेमुळे ओठ कोरडे आणि काळे होऊ शकतात. यासाठी लिप बामचा वापर केला जातो.
बाजारातल्या लिप बाममधल्या रासायनिक घटकांमुळे, ओठ काळे होऊ शकतात. अशावेळी, घरगुती उपचार खूप परिणामकारक ठरतात. या वापरानं फाटलेले ओठ मऊ होतील आणि गुलाबी राहतील. गुलाबाची पाकळी आणि मिल्क लिप बाम, हळद आणि दूध, कोरफड, साखर आणि नारळ तेल स्क्रब या नैसर्गिक पर्यायांचा वापर नक्की करुन बघा.
गुलाबाची पाकळी आणि मिल्क लिप बाम - हे दोन घटक वापरुन लिप बाम बनवणं खूप सोपं आहे. गुलाबाच्या सहा सात पाकळ्या घ्या आणि त्या थंड दुधात भिजवा. पंधरा मिनिटांनंतर, दोन्ही घटक चांगले मिसळून पेस्ट तयार करा.
advertisement
लिप बाम आता तयार आहे. हा लिप बामनं दररोज ओठांवर मसाज करा. यामुळे त्वचा मऊ होईल आणि ओठ गुलाबी होतील. गुलाबात अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे काळे डाग कमी होण्यास आणि ओठ गुलाबी करण्यास मदत करतात. दुधामुळे ओठ मऊ करण्यास मदत होते.
advertisement
हळद आणि दूध - हळद आणि दूध वापरून घरगुती लिप बाम देखील बनवू शकता. यासाठी, एका भांड्यात थोडीशी हळद घ्या आणि त्यात काही थेंब दूध घाला. हे दोन्ही घटक चांगले मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट ओठांना लावा, गोलाकार हालचालीत मालिश करा आणि नंतर ते धुवा. यामुळे फाटलेले आणि काळे ओठ पूर्ववत होण्यास मदत होईल.
advertisement
साखर आणि नारळ तेल स्क्रब - ओठ फाटणं आणि काळे पडणं या समस्येवर साखर आणि खोबरेल तेल हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी, एका भांड्यात एक चमचा साखर आणि अर्धा चमचा खोबरेल तेल एकत्र करा. दोन्ही एकत्र करून स्क्रब तयार करा.
advertisement
यानंतर, हे मिश्रण तुमच्या ओठांना हळूवारपणे लावा आणि ते ओठांमध्ये घासून घ्या. यामुळे मृत त्वचा निघून जाईल आणि तुमचे ओठ पूर्वीपेक्षा मऊ आणि गुलाबी होतील.
कोरफड - लिप बाम म्हणून कोरफडाचा वापर करू शकता. बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांचा वापर करण्याऐवजी, कोरफडीचा ताजा गर काढून ओठांना लावा. यामुळे त्वचा मॉइश्चरायझ होईल आणि ओठ मऊ होतील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 15, 2025 12:30 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Lip Balm : थंडीत राहतील ओठ गुलाबी आणि मऊ, जाणून घ्या घरी लिप बाम बनवण्याची कृती








