Makar Sankranti Shopping : मकर संक्रांतीला देण्यासाठी वाण खरेदी करायचीय? मुंबईत या ठिकाणी फक्त 10 रुपयांपासून मिळतायत वस्तू
- Published by:News18 Marathi
Last Updated:
संक्रांतीच्या निमित्तानं घरोघरी हळदी-कूंकूचे कार्यक्रम होतात.यामध्ये महिलांकडून एकमेकींना वाण दिले जाते.
मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
मुंबई : इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षाच्या सुरूवातीला पहिल्यांदा येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. या सणाला आपण तिळाचे लाडू आणि तिळगुळ वाटून ‘तिळगूळ घ्या गोड- गोड बोला’ असे सांगत वर्षाची सुरुवात आपण गोड करत असतो. यावर्षी 15 जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे. संक्रांतीच्या निमित्तानं घरोघरी हळदी-कूंकूचे कार्यक्रम होतात. यामध्ये महिलांकडून एकमेकींना वाण दिले जाते. याच वाण्याच्या वस्तूंची खरेदी तुम्ही मुंबईच्या दादरमधील एका स्टॉल स्वस्तात करू शकतात.
advertisement
मुंबईतील दादरमध्ये प्लाझा सिनेमाच्या समोर एक स्टॉल आहे जो सध्या अख्ख्या दादरमध्ये फेमस आहे. नाईककाकांचा स्टॉल म्हणून सगळे जण त्यांना ओळखतात. काकांच्या स्टॉलवर मिळणाऱ्या हटके वस्तूंमुळे हा स्टॉल फेमस आहे. अगदी 10 रुपयांच्या डब्यांपासून ते स्टीलच्या स्ट्रॉपर्यंत आणि लाकडी फण्यांपासून ते 50 रुपयाच्या छोट्या फॅनपर्यंत सगळ्या वस्तू इथे पाहायला मिळतील. त्यामुळे नेहमीच्या खरेदीसोबतच येणाऱ्या मकरसंक्रांतीनिमित्त वाणासाठी काहीतरी वेगळ्या आणि हटके वस्तू घ्यायच्या असतील तर काकांचा स्टॉल हा उत्तम पर्याय आहे.
advertisement
कोणकोणत्या मिळतात वस्तू?
या स्टॉलवर वॉशिंग मशीन बॉल, स्टीलच्या स्ट्रॉ, स्टीलची वॉटर बॉटल, लाकडी कंगवे, साबणासारखा हेअर रिमूव्हर, पॉकेट फॅन, छोटी पेपर सोप बॉटल,स्टीलचे फोल्डिंगचे छोटे ग्लास, छोटे डब्बे या आणि यांसारख्या बर्याच गोष्टी तुम्हाला काकांच्या स्टॉलवर पाहायला मिळतील.
advertisement
कधी असतो स्टॉल सुरू?
नाईककाका मिल कामगार होते. मिल बंद पडल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरु केला आणि आज हाच छोटासा व्यवसाय नावारुपाला आला. काकांच्या स्टॉलला जवळपास 35 वर्ष झाली असून त्यांची पुढची पिढीसुद्धा हाच व्यवसाय पुढे नेताना दिसते. स्टॉल छोटा असला तरी स्टॉलवरची आरास मात्र फारच भन्नाट वस्तूंची बघायला मिळते. स्टॉलवर वस्तूंमध्ये खूप व्हरायटी असते. त्यामुळे अनेकजण काकांना आर्जून वस्तूंची ऑर्डरही देण्यासाठी येतात. दादरमधील प्लाझा सिनेमाच्या समोर, शिवाजी मंदीराच्या जवळ नाईक काकांचा स्टॉल आहे. काकांचा स्टॉल सुरु होतो सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 8 ते 9 पर्यंत असतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 12, 2024 10:33 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Makar Sankranti Shopping : मकर संक्रांतीला देण्यासाठी वाण खरेदी करायचीय? मुंबईत या ठिकाणी फक्त 10 रुपयांपासून मिळतायत वस्तू