Cardamom Cultivation : घरच्या घरी सहज पिकवू शकता हिरवी वेलची! एकदा लावा, वर्षानुवर्षे मिळेल शुद्ध मसाला
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to grow cardamom at home : आपण आपल्या बागेत वेलदोडे उगवू शकत नाही का? याचे उत्तर आहे. होय, काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही अगदी सहज तुमच्या कुंडीत वेलदोड्याचे रोप लावू शकता.
मुंबई : हिरव्या वेलचीला मसाल्यांची राणी म्हटले जाते आणि तिचा सुगंध प्रत्येक गोड पदार्थ, चहा आणि जेवणाची चव वाढवतो. मात्र बाजारातील वेलदोडे खूप महाग असते आणि अनेकदा त्यात भेसळही आढळते. अशा वेळी प्रश्न पडतो की, आपण आपल्या बागेत वेलदोडे उगवू शकत नाही का? याचे उत्तर आहे. होय, काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही अगदी सहज तुमच्या कुंडीत वेलदोड्याचे रोप लावू शकता.
एवढेच नाही, तर घरी वेलची उगवली तर वर्षभर शुद्ध आणि ताज्या मसाल्याचा आनंदही घेता येतो. मात्र यासाठी योग्य माती, आर्द्रता आणि योग्य देखभाल यांची माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया घरी वेलची उगवण्याची सोपी पद्धत आणि तिच्या देखभालीचे टिप्स.
वेलची लावण्याचा योग्य काळ कोणता?
वेलची उष्ण आणि दमट हवामानात चांगली वाढते. त्यामुळे जर तुम्ही ती बाल्कनीत लावण्याचा विचार करत असाल, तर थोडी प्रतीक्षा करा आणि फेब्रुवारी ते जुलै या काळात लावण्याचा विचार करा. हा काळ वेलदोडीसाठी सर्वात योग्य मानला जातो.
advertisement
कुंडी आणि माती कशी असावी?
वेलचीची मुळे पसरतात, त्यामुळे 12 ते 16 इंच खोल आणि रुंद कुंडी निवडा. माती हलकी, सेंद्रिय आणि पाण्याचा निचरा होणारी असावी. यासाठी बागेची माती, शेणखत आणि कोकोपीट समप्रमाणात मिसळा.
बिया की रोप?
वेलची बियांपासून उगवणे थोडे कठीण असते, त्यामुळे नर्सरीतून रोप लावणे सोपे ठरते. जर बियांपासून उगवायचे असेल तर ताज्या बिया घ्या आणि 24 तास पाण्यात भिजवून पेरा. अंकुर फुटायला 3 ते 5 आठवडे लागू शकतात.
advertisement
ऊन आणि पाण्याची विशेष काळजी
वेलचीला थेट कडक ऊन नको असते, तर हलकी सावली आवडते. रोज 3 ते 4 तास अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश पुरेसा असतो. माती नेहमी किंचित ओलसर ठेवा, मात्र पाणी साचू देऊ नका.
खत देताना या गोष्टी लक्षात ठेवा
दर 20 ते 25 दिवसांनी वर्मी कम्पोस्ट किंवा शेणखत द्या. सुकलेली पाने वेळोवेळी कापत राहा, त्यामुळे रोप निरोगी राहते.
advertisement
फळे कधी येतील
वेलचीचे रोप 2 ते 3 वर्षांत फळ देऊ लागते. शेंगा हिरव्या आणि भरगच्च दिसू लागल्यावर त्या तोडून घ्या. त्या सावलीत वाळवून साठवून ठेवा.
घरी वेलची उगवण्याचे फायदे
घरी वेलची उगवल्याने तुम्हाला नेहमी शुद्ध आणि ताजा मसाला मिळतो. बाजारातून आणलेल्या वेलदोडीपेक्षा ती जास्त काळ टिकते आणि भेसळीची भीतीही राहत नाही. यामुळे बागेची हिरवळ वाढते आणि वातावरणही अधिक चांगले राहते. तुम्ही ती चहा आणि गोड पदार्थांमध्ये वापरून चव आणि सुगंध दोन्ही वाढवू शकता. थोडीशी देखभाल केली तर वेलचीचे रोप वर्षानुवर्षे फळ देत राहते.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 8:56 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cardamom Cultivation : घरच्या घरी सहज पिकवू शकता हिरवी वेलची! एकदा लावा, वर्षानुवर्षे मिळेल शुद्ध मसाला







