Satara News : समुद्रातल्या 'डायनासॉर'ची शिकार, वन विभागाने दोघांना उचललं, नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कराड येथे दोघांनी बो माऊथ गिटारफिश (Bowmouth Guitarfish) अर्थात डायनासॉर या दुर्मिळ माशाची बेकायदेशीर शिकार केल्याची घटना घडली होती.
Satara News : ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी कराड, सातारा : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कराड येथे दोघांनी बो माऊथ गिटारफिश (Bowmouth Guitarfish) अर्थात डायनासॉर या दुर्मिळ माशाची बेकायदेशीर शिकार केल्याची घटना घडली होती. या शिकारीनंतर या माशाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता आणि त्याला शहरभर दाखवण्यासाठी फिरवण्यात आले होते. या घटनेची माहिती वन विभागाला कळताच दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साताऱ्यातील कराड येथे बो माऊथ गिटारफिश (Bow mouth Guitar fish) या दुर्मिळ माशाची बेकायदेशीर शिकार केल्याप्रकरणी दोघांवर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर आय.यू.सी.एन. (इंटरनॅशनल युनियन फॉर नेचर) संस्थेने गंभीरपणे धोक्यात (Critically Endangered) असल्याचे जाहीर करून रेड डाटा लिस्टमध्ये समाविष्ट केलेल्या बो माऊथ या माशांची कराड मलकापूर येथील अमीर दस्तगीर नदाफ आणि सातारा येथील ओमकार राजेंद्र मेळवणे यांनी माशाची शिकार केली होती. आणि सदर माशाचा व्हिडिओ प्रसारित करून तसेच माशाचे सार्वजनिक प्रदर्शन केल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभागाने कारवाई करत दोन्ही आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 अंतर्गत गन्हा दाखल केला आहे.
advertisement
माशाला बो माऊथ गिटारफिश का म्हणतात?
"बो माऊथ गिटारफिश" (Bowmouth Guitarfish) हा एक खूप खास आणि दुर्मिळ समुद्री मासा आहे, ज्याला वैज्ञानिक नाव Rhina ancylostoma आहे. हे शार्क (शार्क) आणि रे (Ray) यांच्यातील एक प्रकारचा हायब्रिड दिसणारा प्राणी आहे. म्हणजे शार्कसारखा दिसतो पण खरंतर रे (स्टिंगरे किंवा स्केटसारखा) वर्गात येतो.
Bowmouth म्हणजे त्याच्या तोंडाची आकार धनुष्य (bow) सारखी वक्र असते, म्हणजे कमानीसारखी.Guitarfish म्हणजे संपूर्ण शरीराची आकृती गिटार सारखी दिसते, पुढचा भाग रुंद आणि सपाट (रे सारखा), मागचा भाग लांब आणि शार्कसारखा असतो.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 11:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara News : समुद्रातल्या 'डायनासॉर'ची शिकार, वन विभागाने दोघांना उचललं, नेमकं काय घडलं?






