Centipede : सापापेक्षाही धोकादायक असते का घोण? माणसाला चावली तर काय होईल? परिणाम आणि उपाय दोन्ही जाणून घ्या

Last Updated:

आता प्रश्न असा उभा रहातो की घोण ही सापा इतकी घातक असते का? ती नक्की आपल्याला काय करते आणि घोण चावली तर काय होतं? शिवाय यावर उपाय काय? चला जाणून घेऊया.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : पावसाळा जरी थंडावा आणि गारवा घेऊन येत असला, तरी या मोसमात अनेक आजार आणि कीटकांचा धोका खूप वाढतो. ओलसर हवेमुळे वेगवेगळे कीट जमिनीतून बाहेर येतात आणि डंख मारू शकतात. डास, कोळी, झुरळे, गांडुळे यांच्यासह सापसारखे धोकादायक प्राणी घरात येतात. त्यातच एक जीव अनेकदा घरात येतो तो म्हणजे घोण.
लोक याला खूप घाबरतात आणि दिसला की लगेच त्याला मारतात. पण आता प्रश्न असा उभा रहातो की घोण ही सापा इतकी घातक असते का? ती नक्की आपल्याला काय करते आणि घोण चावली तर काय होतं? शिवाय यावर उपाय काय? चला जाणून घेऊया.
घोण विषारी असते का?
हेल्थलाइनच्या माहितीनुसार, घोण खरंच विषारी असते. मात्र त्याचे विष सापासारखे प्राणघातक नसते. त्याच्या जबड्यातून विष निघते आणि तो आपल्या शिकाराला निष्क्रिय करतो. जर ती माणसाला चावली तर त्या विषामुळे वेदना, सूज, लालसरपणा आणि जळजळ होते.
advertisement
घोण चावली हे कसं कळेल? त्याची काय लक्षणं आहेत?
चावलेल्या जागी दोन छिद्रांचे निशाण दिसतात. त्वचा लालसर आणि सुजलेली दिसते. छोटी घोण कमी विष सोडते, त्यामुळे त्याचं चावणं मधमाशीच्या दंशासारखी वाटतं. चावल्यावर लगेच वेदना, सूज आणि लालसरपणा सुरू होतो. काही वेळा तीव्र ॲलर्जी, ताप, मळमळ, हृदयाचे ठोके वाढणे असे लक्षणे दिसू शकतात. हे लक्षणे काही तासांपासून काही दिवसांपर्यंत टिकू शकतात.
advertisement
घोण चावल्यास काय करावं?
चावलेल्या जागी लगेच गरम पाण्याचा शेक करावा. यामुळे विष पातळ होते. तसेच सूज कमी करण्यासाठी बर्फाची पॅक लावू शकता.
डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदना कमी करणाऱ्या आणि ॲलर्जीवर नियंत्रण ठेवणाऱ्या औषधांचा वापर करावा. (उदा. antihistamine, painkillers, anti-inflammatory medicines)
जखमेवर संसर्ग होऊ नये म्हणून तिला स्वच्छ आणि झाकलेली ठेवा. लक्षणे गंभीर असल्यास किंवा काही दिवसांनीही कमी होत नसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
advertisement
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Centipede : सापापेक्षाही धोकादायक असते का घोण? माणसाला चावली तर काय होईल? परिणाम आणि उपाय दोन्ही जाणून घ्या
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement