मुलं कधीच मागणार नाहीत मोबाईल, मैदानात जाऊन खेळतील, सर्व पालकांना माहिती असायलाच हवी 'ही' ट्रिक!

Last Updated:

दुर्देव म्हणजे बाळ रडतंय, त्रास देतंय म्हणून आता आई-वडील स्वत:च त्यांच्या हातात मोबाईल देतात. आमचा मुलगा स्वत: मोबाईलचा लॉक उघडतो, हे सांगताना आई-वडिलांना फार कौतुक वाटतं. मात्र मोबाईलमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासात अडथळे येतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. 

News18
News18
शुभांगी तिवारी, प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोबाईलचं असो किंवा चहाचं असो, व्यसन सोडवणं कठीणच. त्यात लहान मुलं फार हट्टी असतात. त्यांना एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी आगळ्यावेगळ्या युक्त्या शोधाव्या लागतात. आजकाल अशी मोजकीच लहान मुलं असतात जी मोबाईल बघितल्याशिवाय जेवतात किंवा झोपतात. दुर्देव म्हणजे बाळ रडतंय, त्रास देतंय म्हणून आता आई-वडील स्वत:च त्यांच्या हातात मोबाईल देतात. आमचा मुलगा स्वत: मोबाईलचा लॉक उघडतो, हे सांगताना आई-वडिलांना फार कौतुक वाटतं. मात्र मोबाईलमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासात अडथळे येतात हे त्यांच्या लक्षात येत नाही.
advertisement
लहानपणीच स्क्रिनचा अतिवापर झाल्यास लवकरच चष्मा लागू शकतो. कदाचित आयुष्यभर चष्मा लावण्याची वेळ येऊ शकतो. मोबाईल बघत सतत एकाच जागी बसल्यानं लठ्ठपणा येतो, ज्यामुळे शरीराला विविध आजार जडू शकतात. शरीरातला लवचिकपणा कमी होऊ शकतो, परिणामी अंग दुखू शकतं. शिवाय मोबाईलमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीचा पुरेसा वापर होत नाही. मग त्यांच्या हातातून मोबाईल काढायचा तरी कसा?
advertisement
काही पालक मुलांना ओरडतात, मारतात आणि त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतात. ज्यामुळे मुलं चिडचिडी होऊ शकतात, त्यांच्या मनात राग भावना, नकारात्मकता निर्माण होऊ शकते. म्हणूनच ओरडण्यापेक्षा मुलांना मोबाईलमध्ये टाईमपास गेम दाखवणं बंद करा. त्यांना मोबाईलमध्ये काहीतरी शिकता येईल असे गेम दाखवा. अशा गोष्टी दाखवा, ज्यांमुळे त्यांना खराखुरा अभ्यास करावासा वाटेल. परंतु मोबाईल पाहण्याचा कालावधी कसा कमी करावा, जाणून घेऊया.
advertisement
मुलांना स्क्रिनपासून दूर ठेवण्यासाठी विविध पर्याय आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं मन इतर गोष्टींमध्ये गुंतवा. जसं की, चित्रकला, संगीत, नृत्य अशी किमान एकतरी कला त्यांना शिकवा. तसंच जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळायला लावा. यामुळे मुलांच्या हातातून केवळ मोबाईल सुटणार नाही, तर त्यांचं मानसिक, शारीरिक आरोग्यही सुदृढ राहिल.
आपलं वेळापत्रक कितीही व्यस्त असलं तरी आपण आपल्या मुलांना पुरेसा वेळ द्यायलाच हवा, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे आवश्यक आहे. केवळ मुलांची काळजी घेण्यासाठी नाही, तर त्यांच्यासोबत खेळण्यासाठी आपण वेळ काढायला हवा. सकाळी किंवा संध्याकाळी त्यांना बाहेर घेऊन जायला हवं. फिरता फिरता निसर्ग, फळं, भाज्या, दुकानं, वाहतूक, इत्यादींबाबत माहिती द्यायला हवी. जर आपलं मुलांसोबत छान बॉन्ड तयार झालं, आपण त्यांचे मित्र झालात, आपली कंपनी त्यांना आवडू लागली तर आपसूकच ते मोबाईलपासून दूर राहतील आणि खऱ्या जगात स्वच्छंद जगणं पसंत करतील.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मुलं कधीच मागणार नाहीत मोबाईल, मैदानात जाऊन खेळतील, सर्व पालकांना माहिती असायलाच हवी 'ही' ट्रिक!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement