H3N2 Cough Virus : काही केल्या खोकला जात नाहीये, हा व्हायरस आहे! कोरोनानंतर आणखी एका भयंकर आजाराची साथ

Last Updated:

H3N2 Cough Virus Epedemic : हा काही साधा सर्दी-खोकला नाही तर एक खतरनाक व्हायरस H3N2 आहे, जो वेगाने सगळ्यांना आपली शिकार बनवत आहे. संपूर्ण आशियात याची प्रकरणं वाढत आहे, जपानमध्ये तर याला महासाथ घोषित करण्यात आलं आहे.

News18
News18
नवी दिल्ली : सर्दी-खोकला झालाय... घरगुती उपाय केले, डॉक्टरांकडे जाऊन आलात, औषधं-गोळ्या सगळं सगळं घेतलं. शक्य ते सर्व उपचार केले पण खोकला काही बरा होत नाहीये... तुमचंही असंच झालं आहे का? हा खोकला जात का नाही आहे असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? तर सावध व्हा. कारण हा काही साधा सर्दी-खोकला नाही तर एक खतरनाक व्हायरस H3N2 आहे, जो वेगाने सगळ्यांना आपली शिकार बनवत आहे. संपूर्ण आशियात याची प्रकरणं वाढत आहे, जपानमध्ये तर याला महासाथ घोषित करण्यात आलं आहे.
H3N2 इन्फ्लुएंझा A व्हायरसचा एक स्ट्रेन आहे. जो वातावरणामुळे लोकांमध्ये पसरतो. हा व्हायरस श्वसननलिकेवर हल्ला करतो आणि वेगाने पसरतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार H3N2 पहिल्यांदा 1968 मध्ये हाँगकाँगमध्ये समोर आला होता. त्यामुळे याला हाँगकाँग फ्लू असंही म्हणतात. यात दरवर्षी बदल होत असतात ज्याला अँटीजेनिक ड्रिफ्ट म्हणतात. त्यामुळे दरवर्षी या फ्लूसाठी नवीन लस बनवावी लागते.
advertisement
बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, कोरोनापेक्षा किती वेगळा?
फ्लू हा इन्फ्लूएंझा व्हायरस आहे. जो A, B, C, D या कॅटेगिरीत असतो. यात इन्फ्लुएंझा A सगळ्यात गंभीर कॅटेगिरी आहे जी भारत आणि जपानमध्ये आहे. ही कॅटेगिरी इतकी खतरनाक असते की महासाथीचं कारण बनू शकते. बर्ड फ्लू म्हणजे H5N1, स्वाइन फ्लू म्हणजे H1N1 हे याच कॅटेगिरीतील आहेत. भारतात आता जो फ्लू H3N2 पसरतो आहे त्याला हाँगकाँग फ्लूचं नाव दिलं जात आहे. इतर B, C, D कॅटेगिरी इतकी गंभीर नसते.
advertisement
H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस आहे तर COVID 19 एक वेगळा व्हायरस आहे. दोघांमधील ताप, थोकला, थकवा गी लक्षणं सारखी आहेत. पण H3N2 मध्ये डोकेदुखी आणि स्नायूंमध्ये वेदना सामान्य आहे. कोरोनामध्ये तोंडाची चव आणि वास घेण्याची क्षमता जाते. यामध्ये अशी लक्षणं नाहीत.
advertisement
जपानमध्ये या फ्लूची महासाथ
जपानमध्ये या फ्लूचे सगळ्यात जास्त रुग्ण आहत. टाइम मॅगझिनच्या रिपोर्टनुसार मागील 5 आठवड्यांत हा व्हायरस वेगाने  वाढतो आहे. विशेषत: टोकियो, ओकिनावा आणि कागोशिमामध्ये रुग्ण झपाट्याने वाढच आहेत. 22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंत सर्वाधिक 4 हजार लोक याची शिकार झाले आहेत.  हजारो प्रकरणं समोर आल्यानंतर 3 ऑक्टोबरला जपान सरकारने याला महासाथ धोषित केलं. यामुळे १०० पेक्षा जास्त शाळांना सुट्टी देण्यात आली. 10 ऑक्टोबरपर्यंत 6 हजार लोक या आजाराने ग्रस्त आहेत. याआधी 2023-24 मध्ये फ्लूमुळे 1383 मृत्यूची नोंद झीली होती.
advertisement
याशिवाय थायलँड आणि सिंगापूरमध्येही रुग्णांची संख्या वाढत आहे. निम्म्यापेक्षा जास्त लोकांना माहितीच नाही की ते सामान्य सर्दी-खोकला आहे की व्हायरसच्या विळख्यात आहेत.
जीवघेणा आहे का?
तसा हा फ्लू सामान्य आहे. पण काही वेळा जीवघेणा ठरू शकतो. 1957 मध्ये सगळ्यात आधी H2N2 व्हायरसमुळे हा संपूर्ण जगात पसरला, सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते तेव्हा जगभरात 11 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. H3N2 व्हायरस पहिल्यांदा हाँगकाँगमध्ये सापडला होता, 1968 मध्ये फक्त दीड महिन्यात 5 लाख लोक याचे शिकार झाले. त्यानंतर 2009 साली याचा प्रकोप पाहायला मिळाला जेव्हा अमेरिकेत स्वाइन फ्लूचं प्रकरण समोर आलं होतं आणि जगभरात 2 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.
advertisement
WHOच्या मते, जर कुणा कमजोर रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्ती याच्या विळख्यात सापडली तर हा फ्लू सामान्य सर्दी-खोकल्यापेक्षा जास्त गंभीर होऊ शकतो. हा लहान मुलं आणि वृद्धांना जास्त टार्गेट करतो. यात तीव्र ताप आणि न्युमोनियासारखी लक्षणं दिसू शकात. हा सामान्य फ्लूप्रमाणेच खोकला, सर्दी किंवा बोलण्यानेही हवेत पसरतो.
advertisement
भारतातही महासाथ?
H3N2 ची प्रकरणं भारतातही वेगाने वाढत आहेत. यावर्षी जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत एक लाख लोकांची टेस्ट करण्यात आली आहे. त्यापैकी 25 टक्के लोक पॉझिटिव्ह आहेत. दिल्ली एनसीआरमध्ये सगळ्यात जास्त बेकार परिस्थिती आहे. सप्टेंबरमध्ये लोकल सर्कच्या सर्व्हेत समजलं की इथं 69 टक्के घरात कमीत कमी एक सदस्य फ्लूने प्रभावित आहे. हे सगळे H3N2 चे आहेत. यात सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अचानक प्रकरणं वाढली आहेत. मान्सूननंतर थंडी आणि प्रदूषणामुळे ही वाढ झाली आहे.
नेचर जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे फ्लू वर्षभरात पसरू शतको भारतातील लोकसंख्या, प्रदूषण आणि कमी लसीकरण यामुळे हा धोका अधिक वाढतो. विशेषत: थंडीच्या कालावधीत हा धोका जास्त आहे
मुख्य लक्षणं काय आहेत?
अचानक तीव्र ताप
घशात खवखव आणि कोरडा खोकला
थकवा, अशक्तपणा
डोके किंवा अंगदुखी
नाकातून पाणी येणं, शिंका, सर्दीसारखी लक्षणं
उल्टी, जंत, विशेषत: मुलांमध्ये
काय काळजी घ्यायची?
हात स्वच्छ धुवा, सॅनिटाइझर वापरा
गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा
लक्षणं दिसणाऱ्या व्यक्तीपासून एक मीटर दूर राहा
लक्षणं दिसली तर शक्यतो कुणाच्या जास्त संपर्कात येऊ नका
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
H3N2 Cough Virus : काही केल्या खोकला जात नाहीये, हा व्हायरस आहे! कोरोनानंतर आणखी एका भयंकर आजाराची साथ
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement