Hair care Tips : केसांतील कोंडा वाढतोय, शॅम्पूने केसही रुक्ष होतायंत? इन्फ्लुएन्सरने सांगितला घरगुती प्रभावी उपाय
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Dandruff home remedy shared by creater : कधी कधी कोंडा आपल्या केसांमध्ये वाढायला लागतो. महागडे शॅम्पू वापरले तरी कालांतराने तो परत येतो. शिवाय कोंडा घालवण्यासाठी वापरले जाणारे शॅम्पू बऱ्याचदा केसांवर खूप कडक असतात आणि ते केसांना रुक्ष बनवू शकतात.
मुंबई : केसांची स्वच्छता सगळे लोक ठेवतात. आपले केस स्वच्छ, सुंदर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॅन्ड्रफ फ्री ठेवण्याचा लोकांचा प्रयत्न असतो. मात्र तरीही कधी कधी कोंडा आपल्या केसांमध्ये वाढायला लागतो. काही केल्या हा कमी होत नाही. महागडे शॅम्पू वापरले तरी कालांतराने तो परत येतो. शिवाय कोंडा घालवण्यासाठी वापरले जाणारे शॅम्पू बऱ्याचदा केसांवर खूप कडक असतात आणि ते केसांना रुक्ष बनवू शकतात.
कोंडा घालवण्यासाठी आई केस रुक्ष न होण्यासाठी तुम्ही वेगवेगळे उपाय शोधात असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर इशिका गर्ग हिने तिच्या एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने केसांचा कोंडा घालवण्यासाठी एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. चला पाहूया हा उपाय काय आहे.
advertisement
कोंडा घालवण्यासाठी अशी बनवा रिमेडि
- इशिका गर्गच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रथम एका भांड्यात दही घ्या. नंतर त्यात ताजा कोरफडीचा गर आणि मोहरीचे तेल घाला. हे तिन्ही घटक पूर्णपणे एकत्र करा. हे मिश्रण तुमच्या केसांच्या मुळांना 30 ते 45 मिनिटे लावून ठेवा. नंतर केस सौम्य शॅम्पूने स्वच्छ धुवा.
हा उपाय कोंड्यावर कास फायदेशीर आहे?
- यामध्ये दही आहे, ज्यामध्ये लॅक्टिक अॅसिड, अँटी-फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. दही कोंड्याचे प्रमाण कमी करण्यास मदत करू शकते, टाळू हायड्रेट करू शकते, खाज सुटणे आणि कोरडेपणा कमी करू शकते.
advertisement
- त्याचबरोबर यामध्ये असलेली कोरफड अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल आणि हायड्रेटिंग गुणधर्मांनी समृद्ध असते. ती कोंडा घालवण्यासाठी उत्तम आहे. शिवाय कोरफड टाळूचे पीएच पातळी संतुलित करते, खाज कमी करते, जास्तीचे तेल काढून टाकते.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 2:52 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair care Tips : केसांतील कोंडा वाढतोय, शॅम्पूने केसही रुक्ष होतायंत? इन्फ्लुएन्सरने सांगितला घरगुती प्रभावी उपाय









