100 रुपयांपासून खरेदी करा दिवाळीसाठी लेटेस्ट पॅटर्न ब्लाऊज; पुण्यात ‘इथं’ आहे ठिकाण
- Published by:News18 Marathi
Last Updated:
दिवाळीसाठी तुम्हाला पुण्यात ब्लाऊजचे काही लेटेस्ट पॅटर्न कुठे मिळतील याबद्दल माहिती सांगणार आहोत.
पुणे, 10 नोव्हेंबर : दिवाळी म्हटलं की सगळ्यात आधी डोक्यात येते शॉपिंग. सणासुदीला अनेक घरांमध्ये साडीचा डिसेंट लूक केला जातो. सध्या रेडिमेड ब्लाऊजची फॅशन पाहायला मिळतेय. खासकरून बोटनेक, डीपनेक, कॉलर नेक, जॅकेट स्टाईल ब्लाऊज, ऑफ शोल्डर्स, खणांचे ब्लाऊज जास्तीत जास्त महिलांकडून खरेदी केले जातात. त्यामुळे दिवाळीसाठी तुम्हाला पुण्यात ब्लाऊजचे काही लेटेस्ट पॅटर्न कुठे मिळतील याबद्दल माहिती सांगणार आहोत.
पुण्यातील विश्रामबाग वाडा या ठिकाणी वैभवी रेडिमेड ब्लाऊजच दुकान आहे. या ठिकाणी बोटनेक, डीपनेक, कॉलर नेक, जॅकेट स्टाईल ब्लाऊज, ऑफ शोल्डर्स, खणांचे लेटेस्ट पॅटर्नचे ब्लाऊज तुम्हाला खरेदी करता येतील. या ठिकाणी 100 रुपयांपासून ब्लाऊज उपलब्ध आहेत. जुनं ते सोनं असं म्हणतात हे तुम्हाला ब्लाऊज स्टाईल्समध्ये पाहायला मिळेल. ब्लाऊजच्या जुन्या फॅशन आता पुन्हा दिसून येऊ लागल्या आहेत. त्या प्रकारच्या सगळ्या व्हरायटीज तुम्हाला या ठिकाणी मिळतील.
advertisement
दिवाळीसाठी स्वस्तात खरेदी करा कपडे; 200 रुपयांपासून अनेक पर्याय ‘इथं’ उपलब्ध
कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचा जमाना असल्याने कोणत्याही साड्यांवर आपण ब्लाऊज आपल्याला हवं तसं मॅच करू शकतो. लाल, हिरवं, जांभळं, गुलाबी अशा प्रमुख रंगातले ब्लाऊज असले की ते भरपूर साड्यांवर अगदी सहज चालून जातात. त्यामुळे या आकर्षक रंगाचे ब्लाऊज या ठिकाणी उपलब्ध असून योग्य भावात तुम्हाला खरेदी करता येतील.
advertisement
दिवाळीसाठी 40 रुपयांत खरेदी करा आकर्षक लाईट्स, पुण्यात इथं आहे होलसेल मार्केट
वारली पेंटिंगची नक्षी असणारं हे ब्लाऊज या ठिकाणी उपलब्ध आहेत. या प्रिंटमुळे ते कॉटन, लिनन, शिफॉन, खण आणि काठपदर अशा कोणत्याही साडीवर छान दिसेल अशा व्हरायटीज या ठिकाणी असल्याचं दुकानाच्या मालक नम्रता यांनी सांगितलं.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 10, 2023 12:02 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
100 रुपयांपासून खरेदी करा दिवाळीसाठी लेटेस्ट पॅटर्न ब्लाऊज; पुण्यात ‘इथं’ आहे ठिकाण