Diwali Faral Tips : पाहुणे पुन्हा पुन्हा मागतील फराळ, दिवाळीत असा बनवा कुरकुरीत खंमग पोहे चिवडा..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Patal Pohyacha Chivda recipe : अनेक जण दिवाळी फराळासाठी नातेवाईक, शेजारी आणि मित्र मैत्रिणींना घरी बोलवतात. तुम्ही देखील या दिवळीत फराळ बनवण्याची तयारी करत असाल आणि चिवडा बनवण्यासाठी तुम्ही रेसिपी शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी पोहोचला आहात.
मुंबई : दिवाळी म्हटलं तर पाहुणे, चिल्लर पार्टी, मज्जा-मस्तीसोबत फराळाची धामधूम असते. दिवाळी म्हटलं की फराळ आलंच. अनेक जण दिवाळी फराळासाठी नातेवाईक, शेजारी आणि मित्र मैत्रिणींना घरी बोलवतात. तुम्ही देखील या दिवळीत फराळ बनवण्याची तयारी करत असाल आणि चिवडा बनवण्यासाठी तुम्ही रेसिपी शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी पोहोचला आहात. येथे आम्ही तुम्हाला दिवाळीत पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा कसा बनववायचा त्याची रेसिपी सांगत आहोत. दिवाळी संपेपर्यंत मस्त कुरकुरीत राहणारा पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा याची सोपी रेसिपी आणि त्यासाठी लागणारे साहित्य आपण येथे जाणून घेणार आहोत.
एक किलो पातळ पोह्याचा खुसखुशीत चिवडा बनवण्याची रेसिपी येथे देत आहोत. पोहे न आकसण्यासाठी आणि पोह्यांना एकसारखा रंग येण्यासाठी ही अतिशय खास रेसिपी आहे. दिवाळी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा मस्त खमंग पातळ पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ते पाहूया.
पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
पातळ पोहे -1 kg
धने पुड -3 tbsp (30gm)
advertisement
चाट मसाला -2 tbsp(30gm)
पिठीसाखर -6 tbsp (50 gm )
मीठ-2 tbsp (30gm)
जिरे -3 tbsp (30 gm )
बडीशेफ -2 tbsp(25 gm )
लसुन -1/4 cup (45gm)
हिरवी मिरची -7 to 8 (50gm)
तेल - 1/2 cup (145 gm )
हळद -3 tbsp (25 gm )
मोहरी -2 tbsp (20gm)
advertisement
हिंग
तीळ 2 tbsp (20gm )
शेंगदाणे -1 & 1/4 cup (195gm)
काजु - 1 cup ( 150gm )
डाळं -1&1/4 cup ( 200gm)
मनुका - 1/4 cup( 100gm)
कडीपत्ता 1 cup
तेल आणि हळदीसोबत पोहे भाजून घ्या
सर्वप्रथम 1 किलो पातळ पोहोच चाळून घ्या. हे पोहे खूप नाजूक असल्याने त्यात चुरा असतो. चाळून घेतल्याने तो चुरा निघून जातो. आता पॅन गॅसवर ठेवा, त्यात तेल आणि थोडी हळद घाला आणि नंतर थोडे थोडे करून अशा प्रकारे सर्व 1 किलो पातळ पोहे भाजून घ्या. सुरुवातीलाच अशा प्रकारे तेल आणि हळदीसोबत पोहे भाजून घेतल्याने पोह्यांना एकसारखा रंग येतो आणि ते आकसत नाहीत.
advertisement
कोरडा मसाला तयार करा
सगळे पोहे भाजून घेतल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चाट मसाला, धने पूड, मीठ आणि पिठीसाखर एकत्र वाटून घेतले. चिवड्यासाठी हा चटपटीत असा कोरडा मसाला तयार झाला. या मसाल्यामुळे चिवड्याला चटपटीत अशी चव येते.
ओला मसाला तयार करून घ्या
आता ओला मसाला तयार करण्यासाठी लसूण, जिरे, बडीशेप पाणी न घालता वाटून घ्या. शेंगदाणे आणि काजू लालसर होईपर्यंत खरपूस तळून घ्या. डाळ देखील हलकाला रंग बदलेपर्यंत तळून घ्या. तळलेले पदार्थ ताटामध्ये काढून घ्या. त्यानंतर धुवून पुसून घेतलेला कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
advertisement
आता पाव वाटी तेल एका छोट्या पॅनमध्ये काढून घ्या, यामध्ये बारीक करून घेतलेली हिरवी मिरची कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आणि तेल गाळून घ्या. गाळून घेतलेले तेल पुन्हा छोट्या पॅनमध्ये घ्या आणि त्यात मोहोरी, हिंग आणि तिळ घालून थोडावेळ परतून घ्या. यानंतर त्यात ओला मसाला आणि हळद घालून चांगलं तळून घ्या.
advertisement
advertisement
सगळे मसाले मिक्स करून घ्या
आता तळलेल्या साहित्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून घ्या. यामध्ये मनुके सुद्धा मिसळून घ्या. यामुळे या तळलेल्या साहित्यालाही मसाला चांगला चिकला जातो.
कोरडा आणि ओला मसाला पोह्यात मिक्स करा
आता उरलेला सगळा कोरडा आणि ओला मसाला चिवड्यामध्ये काढून घ्या. सुरुवातीला कोरडा मसाला मिक्स करून घ्या, नंतर ओला मसाला देखील मिक्स करून घ्या. आता त्यात सर्व तळून घेतलेलं साहित्य घाला. सुरुवातीला हाताने मिक्स न करता स्पॅच्युल्याच्या साह्याने छान मिक्स करून घ्या. यामुळे चिवड्याचा चुरा होत नाही. कारण हा चिवडा अतिशय पातळ असतो आणि या पद्धतीने बनवला तर अतिशय कुरकुरीत होतो. या दिवळीत ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2025 5:52 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diwali Faral Tips : पाहुणे पुन्हा पुन्हा मागतील फराळ, दिवाळीत असा बनवा कुरकुरीत खंमग पोहे चिवडा..