Diwali Lakshmi Puja : लक्ष्मीपूजन कसं करायचं? मांडणी आणि पूजेची योग्य पद्धत
- Published by:Priya Lad
Last Updated:
Diwali Laxmi Pujan : जर पहिल्यांदाच लक्ष्मीपूजन करत असाल तर काळजी करू नका कोणकोणतं पूजा साहित्य यासाठी लागतं आणि ही पूजा कशी करायची? याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
दिवाळीचा दुसरा दिवस लक्ष्मीपूजन. मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि भक्तांना आशीर्वाद देते. त्यामुळे लोक विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा करतात. तुम्ही जर पहिल्यांदाच लक्ष्मीपूजन करत असाल तर काळजी करू नका कोणकोणतं पूजा साहित्य यासाठी लागतं आणि ही पूजा कशी करायची? याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
दिवाळीच्या या दिवसात संपूर्ण विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा केली जाते. यामध्ये काही लोक चोपडी पूजन, शंख पूजन, कवडी पूजन सारख्या वेगवेगळ्या गोष्टींची पूजा करतात.
लक्ष्मीपूजन सामग्री
गणपती आणि लक्ष्मीची नवीन मूर्ती किंवा फोटो
वही-खाते लिहिलेली वही किंवा चोपडी
लक्ष्मीसाठी एक लाल रेशवस्त्र आणि एक पिवळे वस्त्र
देवाच्या आसनासाठी लाल कापड
मूर्तीसाठी लाकडी स्टूल
advertisement
मातीचे पाच मोठे दिवे
25 लहान मातीचे दिवे
एक मातीचे भांडे
ताज्या फुलांच्या किमान तीन माळा
बिल्वची पाने आणि तुळशीची पाने
मिठाई, फळे, ऊस, 3 देठाची पानं, दुर्वा, पंच पल्लव, जनेयू, कापूर, दक्षिणा, धूप, गहू, लोणी, बताशे, शाई,
advertisement
अशी करा लक्ष्मीची पूजा
लक्ष्मीपूजन करताना एक चौरंग घ्यावा. चौरंग स्वच्छ असावा, त्यावर लाल रंगाचा कपडा घालावा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे.
चांदी, तांबा किंवा मातीचं कलश घ्यावं त्यात गंगाजल मिसळून घ्यावे. कलशावर नारळ ठेवून त्यात एक आंब्याचे डहाळे ठेवावे. कलशाभोवती फुलांची आरास करावी. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी.
advertisement
लक्ष्मी देवीसमोर सोने, चांदी किंवा साधी नाणी ठेवावी. यानंतर कलशाच्या उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करावी. लक्ष्मीजवळ व्यापार संबंधित पुस्तक किंवा डायरी, नवीन डायरी ठेवावी.
पूजेचे सामान शुद्ध करावे. यानंतर लक्ष्मी, गणपती आणि स्थापन केलेल्या अन्य देवतांचे आवाहन करावे.
advertisement
लक्ष्मी मंत्र किंवा ‘ऊँ महालक्ष्मयै नम:’ मंत्र उच्चारून स्थापन केलेल्या देवतांची पंचामृतासह पूजा करावी.
यानंतर धूप, दीप, नैवैद्य अर्पण करावा. पूजा झाल्यावर आरती करावी. आरतीनंतर लक्ष्मी देवीला घरात आगमानाची प्रार्थन करावी आणि काही चुकले असल्यास क्षमायाचना करावी.
लक्ष्मीपूजनावेळी पाळायचे काही नियम
view commentsलक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या बारा वाजेपर्यंत सुरू ठेवावेत. लक्ष्मी पूजन सुरू असताना कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नये. या रात्री अखंड ज्योत तेवत ठेवावी लक्ष्मी देवीला शिंगाडा, बत्ताशे, लाह्या, करंजी, तांदळाचे लाडू, मूगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर मिठाई अत्यंत प्रिय आहे. यापैकी कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.
Location :
Maharashtra
First Published :
October 20, 2025 1:52 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diwali Lakshmi Puja : लक्ष्मीपूजन कसं करायचं? मांडणी आणि पूजेची योग्य पद्धत