गिफ्ट पाहून बंधूराज होतील खूश, अंधेरीत फक्त 500 रुपयांत करा खास खरेदी, Location

Last Updated:

Diwali Shopping: भाऊबीज निमित्त भावाला गिफ्ट देण्यासाठी अंधेरी मार्केटमध्ये उत्तम पर्याय उपलब्द आहेत. फक्त 500 रुपयांपासून शर्ट आणि कुर्ते खरेदी करू शकता.

+
यंदाच्या

यंदाच्या भाऊबीजेला स्वस्त दरात ५०० रुपयांच्या  बजेटनुसार द्या भावांना गिफ्ट...

प्रियांका जगताप, प्रतिनिधी
मुंबई: सध्या घरोघरी दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. भाऊबीज हा सण भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा मानला जातो. या दिवशी आपल्या बहिणी आपल्या भावाला आणि भाऊ आपल्या बहिणीला खास गिफ्ट देतात. आपणही आपल्या भावाला एखादी भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी बेस्ट पर्याय आहे. मुंबईतील अंधेरी मार्केटमध्ये अगदी स्वस्तात गिफ्टचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. विविध व्हरायटींचे शर्ट आणि कुर्तेही इथे मिळतात. लोकल18 च्या माध्यमातून थेट मार्केटमधूनच याबाबत जाणून घेऊ.
advertisement
फक्त 500 रुपयांपासून शर्ट
आपल्या भावाला गिफ्ट देण्यासाठी अंधेरी मार्केटमध्ये फक्त 500 रुपयांपासून शर्ट आणि कुर्ते उपलब्ध आहेत. हे मार्केट अंधेरी स्टेशनजवळून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. ‘टाइम्स पॉइंट अंधेरी’ येथे शर्टच्या अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत. सध्या फ्लोरल प्रिंट्स आणि पेस्टल रंगछटा फार चर्चेत असतात. तुम्ही देखील भाऊबीज निमित्त आकर्षक शर्ट शोधत असाल तर अंधेरी मार्केट मोठं कलेकश्न पाहायला मिळेल. यात प्रिंटेड शर्ट, डिजीटल डिझाइन शर्ट, प्लेन कॉटन शर्ट, चेक्समध्ये वेगवेगळ्या रंगछटा असलेले शर्ट, डेनिम कलेक्शन शर्ट आदी विविध प्रकारचे शर्ट अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत.
advertisement
दरम्यान, मुंबईतील अंधेरी मार्केट प्रसिद्ध आहे. याठिकाणी वेगवेगळ्या वस्तू अगदी स्वस्तात मिळतात. तसेच कपड्यांचं मार्केटही मोठं आहे. तुम्ही आपल्या भाऊ आणि बहिणीला सुद्धा येथून आकर्षक कपडे खरेदी करू शकता. भाऊबीजेला अगदी स्वस्तात मस्त शर्ट घेऊन आपल्या भावाला खूश करण्याची चांगली संधी आहे. त्यासाठी येथील मार्केटला नक्की भेट द्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
गिफ्ट पाहून बंधूराज होतील खूश, अंधेरीत फक्त 500 रुपयांत करा खास खरेदी, Location
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement