अचानक उठल्यावर चक्कर येते? याकडे दुर्लक्ष करु नका 'ही' असू शकतात गंभीर आजाराची लक्षणं

Last Updated:

ही अवस्था अनेक लोक अनुभवतात आणि काही वेळा ती क्षणिक वाटते. मात्र, वारंवार असं घडत असेल, तर याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आपण अनेकदा खूप जास्त वेळ एकाच ठिकाणी बसलेलो किंवा आडवं झोपलेलो असताना अचानक उठलो की डोकं गरगरायला लागतं किंवा चक्कर आल्यासारखं वाटतं. कधीकधी तर नजर धूसर होते आणि अशक्तपणा जाणवतो. ही अवस्था अनेक लोक अनुभवतात आणि काही वेळा ती क्षणिक वाटते. मात्र, वारंवार असं घडत असेल, तर याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.
या स्थितीला वैद्यकीय भाषेत ऑर्थोस्टेटिक हायपोटेंशन असं म्हणतात. ही एक प्रकारची लो ब्लड प्रेशरची अवस्था आहे, जी शरीराच्या पोझिशनमध्ये अचानक बदल झाल्यावर घडते. विशेषतः झोपलेली किंवा बसलेली व्यक्ती अचानक उभी राहिल्यावर.
कोणाला जास्त धोका असतो?
वयोवृद्ध व्यक्तींमध्ये ही समस्या अधिक सामान्य असते. उन्हाळ्यात किंवा शरीरातील डिहायड्रेशनमुळेही चक्कर येऊ शकते. काही विशिष्ट औषधं घेत असल्यास, त्याचा दुष्परिणाम म्हणूनही ही स्थिती निर्माण होऊ शकते
advertisement
मुख्य लक्षणं कोणती?
अचानक चक्कर येणं किंवा डोकं फिरणं, नजर धूसर होणं, थकवा किंवा अशक्तपणा, उभं राहताच अशक्त वाटणं इत्यादी.
कधी कधी हे लक्षणं साधारण वाटू शकतात, पण वारंवार असं घडत असेल, तर वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे.
यापासून कसं वाचाल?
झोपलेली किंवा बसलेली अवस्था अचानक उठू नका हळूहळू उठण्याचा सराव करा
advertisement
शरीर हायड्रेट ठेवा, दिवसभर भरपूर पाणी प्या
नियमित व्यायाम करा, यामुळे रक्ताभिसरण सुधारतं
अत्यंत गरम हवामानात सावध राहा, शक्यतो थंड जागेत रहा
डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांचं प्रमाण समतोल ठेवा
आपल्या रोजच्या सवयी थोड्या बदलल्यास अशा अडचणींपासून सहज बचाव करता येतो. शरीराचा इशारा समजून घेणं आणि वेळेवर काळजी घेणं हेच आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
अचानक उठल्यावर चक्कर येते? याकडे दुर्लक्ष करु नका 'ही' असू शकतात गंभीर आजाराची लक्षणं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement