Fridge Expiry Date : फ्रिजलाही असते एक्सपायरी, 'हे' संकेत मिळत असतील तर व्हा सावध! होईल मोठं नुकसान
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
What is expiry date of Fridge : आपल्याला दीर्घकाळ अन्न सुरक्षित आणि फ्रेश ठेवायचे असेल तर फ्रिज हा उत्तम मार्ग आहे. फ्रिजमध्ये अन्न सुरक्षित राहते, मात्र एका गोष्टीमुळे हेच फायदेशीर फ्रिज तुमचे मोठे नुकसान करू शकते.
मुंबई : फ्रिज आहे आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा भाग आहे. हल्ली अन्नपदार्थ साठवण्यासाठी जवळपास सर्वच घरांमध्ये फ्रिज वापरले जाते. त्याचे तितके जास्त फायदेही आहेत. आपल्याला दीर्घकाळ अन्न सुरक्षित आणि फ्रेश ठेवायचे असेल तर फ्रिज हा उत्तम मार्ग आहे. फ्रिजमध्ये अन्न सुरक्षित राहते, मात्र एका गोष्टीमुळे हेच फायदेशीर फ्रिज तुमचे मोठे नुकसान करू शकते.
घरांमध्ये वर्षांनुवर्षे फ्रिज वापरले जाते मात्र त्याचीही एखादी एक्सपायरी डेट असेल हे कुणी फारसे माहित करून घेत नाही. त्यामुळे फ्रिजची कार्यक्षमता बिघडते आणि आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. आज आम्ही तुम्हाला फ्रिजची एक्सपायरी डेट कशी ओळखायची आणि त्यामुळे आपल्याला काय तोटे होऊ शकतात याबद्दल माहिती घेणार आहोत.
प्रत्येक रेफ्रिजरेटरचे आयुष्यमान म्हणजेच एक्सपायरी डेट वेगवेगळी असते. अमेरिकेतील सीयर्स होम सर्व्हिसेसच्या अहवालात हे स्पष्ट करण्यात आले. या अहवालानुसार, एक चांगले फ्रिज साधारणपणे 10 ते 20 वर्षे टिकते. मात्र हे त्याच्या गुणवत्तेवर, तुम्ही त्याची काळजी कशी घेता आणि त्याच्या सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असते.
advertisement
फ्रिज किती काळ टिकू शकते?
चांगले फ्रिज साधारणपणे 10 ते 20 वर्षे टिकते. फ्रिज वरचे फ्रीजर कंपार्टमेंट 10 ते 15 वर्षे टिकते. भाज्या, दूध आणि इतर वस्तू साठवण्यासाठी असलेले खालचे कंपार्टमेंट 15 ते 20 वर्षे टिकते. तसेच फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटर 15 ते 20 वर्षे टिकतात.
फ्रिज जास्तकाळ कसे टिकवावे?
- फ्रिज विश्वासार्ह कंपनीचे आणि चांगल्या दर्जाचा असेल ते जास्त काळ टिकेल.
advertisement
- जर कंडेन्सर कॉइल नियमितपणे स्वच्छ केले गेले तर फीज जास्त काळ टिकते.
- फ्रिजवर जास्त भार टाकणे टाळावे आणि ते स्वच्छ ठेवले तर ते जास्त काळ टिकेल.
- अति उष्णता किंवा आर्द्रता रेफ्रिजरेटरवर अधिक ताण आणते, ज्यामुळे ते लवकर खराब होऊ शकते.
- फ्रिज सामान्य तापमानात ठेवल्यास जास्त काळ टिकते.
advertisement
फ्रिज खराब होताना दिसतात हे संकेत
- फ्रिज खराब झाले असेल तेव्हा ते जास्त मोठा आवाज करू लागते.
- फ्रिज व्यवस्थित साफ केल्यानंतरही त्यातून दुर्गंध येणे ही एक समस्या असू शकते.
- फ्रिजचे तापमान स्थिर राहत नसेल. काही भाग गरम राहतो आणि अन्न लवकर खराब होते.
वरील सर्व लक्षणं दिसल्यास समजून जा तुमच्या फ्रिजची थंड करण्याची क्षमता कमी होत आहे. या सर्व गोष्टी सूचित करतात की तुमच्या फ्रिजची एक्स्पायरी डेट जवळ येत आहे.
advertisement
फ्रिज जास्त काळ टिकवण्यासाठी फॉलो करा या टिप्स
- तुमच्या फ्रिजचे आयुष्य वाढवण्यासाठी दर सहा महिन्यांनी त्याचे मागील ग्रिल स्वच्छ करा.
- फ्रिजमध्ये जास्त पदार्थ किंवा वस्तू ठेऊ नका.
- फ्रिजच्या दरवाजाचे रबर सील सुरक्षित आहे की नाही ते तपासा.
- फ्रिज सरळ ठेवा आणि हवा खेळती राहण्यासाठी फ्रिजच्या चारही बाजूंना थोडी जागा सोडा.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2025 11:30 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Fridge Expiry Date : फ्रिजलाही असते एक्सपायरी, 'हे' संकेत मिळत असतील तर व्हा सावध! होईल मोठं नुकसान


