'इथले' छोले-भटुरे भलतेच फेमस! खाण्यासाठी लागतात मुंबईकरांच्या रांगा
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
सॅन्डविच, चायनीज हे पदार्थ ठिकठिकाणी सर्रास मिळतात. म्हणूनच 2 मित्रांनी छोले भटुरे विकण्याचा निर्णय घेतला.
प्रियंका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : इथं कोपऱ्या-कोपऱ्यात खाद्यपदार्थांची दुकानं असतात. जिथं अत्यंत चविष्ट पदार्थ मिळतात. त्यात नवीन दुकान सुरू करून मुंबईकरांचं मन जिंकणं हे मोठं आव्हानच. परंतु अनेकजण हे आव्हान स्वीकारतात आणि त्यात यशस्वी होतात. अशाच 2 मित्रांनी स्वादिष्ट छोले भटुरे विकून मुंबईकरांचं मन जिंकलंय.
मरोळ इथं त्यांच्याकडील छोले भटुरे खायला ग्राहकांची मोठी गर्दी असते. ते 60 रुपयांना 1 प्लेट छोले भटुरे विकतात. ज्यात एका व्यक्तीचं पोट अगदी फुल्ल होऊ शकतं.
advertisement
मुंबईतलं जगणं एवढं फास्ट आहे की इथं फास्ट फूडला विशेष मागणी असते. घरी जेवण बनवायला वेळ मिळाला नाही किंवा डबा आणणं शक्य झालं नाही, तर लोक बाहेर कमी किंमतीत उत्तम चवीचे पदार्थ खातात. सॅन्डविच, चायनीज हे पदार्थ ठिकठिकाणी सर्रास मिळतात. म्हणूनच या 2 मित्रांनी छोले भटुरे विकण्याचा निर्णय घेतला.
advertisement
मुंबईत मरोळ जे बी नगर या मेट्रो स्टेशनजवळ त्यांनी एक लहान स्टॉल सुरू केलं. सुरूवातीला ते दुसऱ्यांच्या स्टॉलवर काम करायचे, परंतु त्यांना स्वतःचं काहीतरी करायचं होतं. मग त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. त्यांच्याकडील छोले भटुऱ्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. मग काय, हा व्यवसाय जोमानं सुरू झाला. उत्तम चव हे त्यांचं वैशिष्ट्य आहेच. शिवाय ते स्वच्छतेबाबतही विशेष काळजी घेतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 10, 2024 4:36 PM IST