Sweet Chilli Recipe Video : आठवतायेत का शाळेजवळ मिळणाऱ्या या गोड लाल-हिरव्या मिरच्या? घरीच कशा बनवायच्या पाहा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Sweet Chilli Recipe Video : कित्येक शाळेबाहेरील दुकानात मिळणारी ही गोड मिरची, तुम्ही खाल्ली असेल. पण ती कशी बनवतात माहिती आहे का? आम्ही तुमच्यासाठी त्याची रेसिपी आणली आहे.
यम्मी... फोटो पाहूनच तोंडाला पाणी सुटलं ना... पटकन शाळा आठवली असेल... कित्येकांच्या शाळेची ही आठवण आहे... शाळेजवळ मिळणारा हा खाऊ... गोड मिरच्या, लाल-हिरव्या गोड मिरच्या... मधल्या सुट्टीत, शाळा सुटल्यावर तुम्ही नक्की खाल्ल्या असतील. आता या मिरच्या पाहून पुन्हा ते खाव्याशा वाटत असतील. आता तुम्ही शाळेच्या त्या दुकानात तर जाऊ शकत नाही किंवा शाळा असेल पण ते दुकान तिथं असेल की नाही ते माहिती नाही. पण डोंट वरी... या मिरच्या तुम्ही घरीच बनवू शकता. आम्ही तुमच्यासाठी याची रेसिपी आणली आहे.
या गोड मिरच्या पाहिल्या की कशा बनवत असतील, असा प्रश्न आपल्याला खाताना पडला असेल. आताही या मिरच्या पाहिल्यावर बनवायच्या कशा असं तुम्हाला वाटत असेल, किंवा याची रेसिपी कठीण वाटत असेल. पण जितकी या मिरचीची रेसिपी कठीण वाटते तितकी बिलकुल नाही. अगदी कमी साहित्यात आणि पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे.
advertisement
साहित्य
तांदळाचं पीठ - 2 कप
बारीक रवा - २ टेबलस्पून
साखर - 1 कप
मीठ - चवीनुसार
हिरवा आणि लाल रंग
कृती
एका भांड्यात तांदळाचा पीठ, बारीक रवा मिक्स करा. रव्यामुळे मिरची जास्त दिवस कुरकुरीत राहतो. थोडंसं मीठ घाला. आता साध्या पाण्यात पीठ मळून घ्या. याचे तीन भाग करून घ्या, एक भाग हिरव्या मिरचीसाठी, एक लाल मिरचीसाठी आणि तिखट मिरचीसाठी. भागानुसार रंग घाला. तिखटाच्या मिरचीत थोडं मीठ घालायचं आहे. नंतर सगळ्या भागांना तेलही लावून घ्या.
advertisement
आता एकएक गोळा घेऊन त्यातील छोटा गोळा घेऊन तो लांब करून घ्या, मध्ये चपटा किंवा खड्डा करून घ्या. आणि पुन्हा रोल करा. यामुळे आतमध्ये थोडी पोकळी राहिल. त्या कापून हातावर रोल करून घ्या. हे नेमकं काय करायचं ते तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. गॅसवर एका भांड्यात तेल गरम करून घ्या, मंद आचेवर मिरच्या तळून घ्या.
advertisement
आता साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यात साखर टाका. आता यात साखर भिजेल इतकंच पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला कडक पाक हवा आहे आणि पाक लवकरही बनेल. मध्यम आचेवर एकतारी पाक बनवून घ्या. पाक एकतारी किंवा त्यापेक्षा जास्त तारा झाल्या तरी चालतील पण कच्च्या पाकात मिरच्या टाकू नका नाहीतर तर कुरकुरीत नाही तर नरम होती.
advertisement
पाक तयार झाला की मिरच्या त्यात टाकून पाक आटेपर्यंत परतत राहा. क्रिस्टल म्हणजे मिरच्यांवर साखरेचा पांढरा थर येईपर्यंत परतत राहा. यात लिंबू रस वगैरे टाकू नका, जसं बालुशाहीसाठी करतात. नाहीतर असा क्रिस्टल त्यावर येणार नाही. परतत राहिल्यावर काही वेळाने तुम्हाला दिसेल साखर पूर्ण सुकेल, मिरच्या कोरड्या होतील, त्यावर साखरेचा थर बसेल. आता हे थंड करून घ्या आणि अतिरिक्त साखर चाळून काढून टाका.
advertisement
सरिताज किचन या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
November 28, 2025 8:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Sweet Chilli Recipe Video : आठवतायेत का शाळेजवळ मिळणाऱ्या या गोड लाल-हिरव्या मिरच्या? घरीच कशा बनवायच्या पाहा


