6 वर्षांपासून तिचं चव, मठ्ठा पिण्यासाठी लागते चक्क रांग, जालन्यातील हे ठिकाण माहितीये का?

Last Updated:

उन्हाळा सुरू होताच थंड पेयांना मागणी वाढते. जालना शहरामध्ये जय बजरंग मठ्ठा सेंटरवर दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत ग्राहकांची अक्षरशः रांग असते.

+
News18

News18

नारायण काळे, प्रतिनिधी  
जालना : उन्हाळा सुरू होताच थंड पेयांना मागणी वाढते. जालना शहरामध्ये जय बजरंग मठ्ठा सेंटरवर दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत ग्राहकांची अक्षरशः रांग असते. शुद्ध दह्यापासून आणि त्यामध्ये वेगवेगळे मसाले घालून 15 रुपयाला एक ग्लास याप्रमाणे मठ्ठ्याची विक्री केली जाते. दररोज 500 ते 600 ग्लास मठ्ठा तर 200 ते 300 ग्लास लस्सीची या स्टॉलवर विक्री होत आहे. दोन्ही मिळून 700 ते 800 ग्लास थंड पेयाची विक्री होत असून दररोज 10 हजारांपर्यंत त्यांचा टर्न ओव्हर होतो. यातून 4 ते 5 हजाराचा निव्वळ नफा गोपाळ ठाकूर यांना होत आहे.
advertisement
6 वर्षांपूर्वी जालना शहरातील रहिवासी असलेल्या गोपाळ ठाकूर यांनी पोलीस कॉम्प्लेक्स समोर जय बजरंग मठ्ठा सेंटर या नावाने आपला स्टॉल सुरू केला. हळूहळू मोठ्यामध्ये वेगवेगळे प्रयोग केल्याने आणि ग्राहकांशी आपुलकीचे नातं जपल्याने त्यांच्या मठ्ठ्याचा जालना शहरांमध्ये मोठा ग्राहक वर्ग तयार झाला आहे.
advertisement
दुपारी दोन वाजता स्टॉल लागण्याची ग्राहक अक्षरशः वाट पाहत असतात. शुद्ध देशी दही त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, बुंदी घालून शाही मठ्ठा ग्राहकांना दिला जातो. त्याचबरोबर उत्तम गुणवत्तेची लस्सी देखील ग्राहकांना दिली जाते. काही मठ्ठा 15 रुपयांना ग्लास तर शाही लस्सी 30 रुपयांना ग्लास या पद्धतीने या दोन्ही थंडपेयांची विक्री केली जाते.
advertisement
ग्राहकच माझा भगवान आहे. बजरंग बलीच्या आशीर्वादाने सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. दररोज 60 ते 70 लिटर दही माझ्या स्टॉलवर विक्री होते. ग्राहकांची गर्दी तर तुम्ही पाहतच आहात, माझ्या आधी ग्राहक आलेले असतात. गुणवत्ता उत्तम आणि ग्राहकांशी प्रेमाची संबंध यामुळे इथे भरपूर गर्दी असते. गर्दीमध्ये मला सगळ्यांनाच मठ्ठा, लस्सी देणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकदा ग्राहकच स्वतःच मठ्ठा आणि लस्सी स्वतःच्या हाताने घेतात आणि पैसे देखील स्वतःच आणून देतात. दररोज 500 ते 600 ग्लास मठ्ठा आणि 200 ते 300 ग्लास लस्सी असे 700 ते 800 ग्लास थंड पेय विक्री होते. यामधून 10 हजारांचा टर्न ओव्हर होतो. 5 ते 6 हजारांचा निव्वळ नफा होत असल्याचे जय बजरंग मठ्ठा सेंटरचे मालक गोपाळ ठाकूर यांनी सांगितले.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
6 वर्षांपासून तिचं चव, मठ्ठा पिण्यासाठी लागते चक्क रांग, जालन्यातील हे ठिकाण माहितीये का?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement