दिवाळीसाठी घरगुती फराळ करा स्वस्तात खरेदी, दादरमधील हा स्टॉल तुमच्यासाठी बेस्ट!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pratikesh Patil
Last Updated:
अवघ्या काही दिवसात दिवाळीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मुंबईत तुम्हाला स्वस्तात फराळ कुठे खरेदी करता येतील याबद्दल माहिती सांगणार आहोत.
प्रतिकेश पाटील, प्रतिनिधी
मुंबई : अवघ्या काही दिवसात दिवाळीला सुरुवात होणार आहे. दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच. घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईमध्ये सर्वांनाच फराळ बनवणे शक्य होत नाही. मग रेडिमेड फराळ घेतल्याशिवाय लोकांना दुसरा पर्याय नसतो. यात सर्वांना घरगुती फराळ मिळाला तर आनंद होतो. त्यामुळे मुंबईत तुम्हाला स्वस्तात फराळ कुठे खरेदी करता येतील याबद्दल माहिती सांगणार आहोत.
advertisement
मुंबईतील दादर परिसरात कोहिनूर मॉलच्या समोर स्वामी समर्थ मठ असणाऱ्या गल्लीच्या बाजूला गेल्या तब्बल पंचवीस वर्षापासून सीमा नायक तीन पिढ्यांपासून फराळ विकण्याचा व्यवसाय करत आहेत. यामध्ये त्यांना त्याचं कुटुंब फराळ विकण्यासाठी मदत करत. फराळ घेण्यासाठी बाहेरून, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारी लोक आणि होलसेल दुकानदार सुद्धा यांच्याकडे येत असतात.
advertisement
सीमा नायक यांच्याकडे दिवाळीत लागणारा सर्व फराळ अत्यंत अल्प दरात आणि चांगला कॉलिटीचा फराळ मिळतो. ऑइल फ्री भाजणीची चकली यामध्ये ही चकली फ्राय करून मग मशीनमध्ये टाकून त्यातलं ऑइल काढून टाकल जात. त्यामुळे बाहेरगावी घेऊन गेल्यावर ती जास्त काळ टिकवावी म्हणून या चकलीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
याप्रमाणे शंकरपाळ्यामध्ये दोन प्रकार भेटतात. एकामध्ये नमिकिन शंकरपाळी आणि दुसरी गोड शंकरपाळी आहे. याची किंमत 160 रुपये अर्धा किलो आहे. तर गहव्याच्या पिठाच्या कमी गोड वाल्या शंकरपाळी 160 रुपये अर्धा किलोला सुद्धा येथे मिळतात. अनारसेची किंमत अर्धा किलो 600 रुपये यामध्ये 25 पीस अनारसे येतात. तर मुगाची चकली दीडशे रुपये पाव किलो मिळते. चार प्रकारचे चिवडे आहेत. याची किंमत 160 रुपये किलो आहे. जर तुम्हाला स्वस्तात रेडीमेड दिवाळीसाठी फराळ पाहिजे असेल तर दादर मधील सीमा नायर यांच्या स्टॉलला नक्की भेट द्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 26, 2024 7:46 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
दिवाळीसाठी घरगुती फराळ करा स्वस्तात खरेदी, दादरमधील हा स्टॉल तुमच्यासाठी बेस्ट!