खवय्यांची चंगळ, पिझ्झाचे 35 हुन अधिक प्रकार एकाच ठिकाणी, किंमत फक्त 99 रुपये
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
एफबीएफ पिझ्झेरिया या पिझ्झा शॉपमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये पिझ्झा मिळतो. यांची स्पेशलिटी म्हणजे इथे पिझ्झाचे तब्बल 30 ते 35 हुन अधिक प्रकार आहेत.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : आजच्या काळात सर्वात जास्त पसंत केल्या जाणाऱ्या फास्टफूड पैकी एक म्हणजे पिझ्झा आहे. मालाड स्थानकापासून फक्त 20 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या एफबीएफ पिझ्झेरिया या पिझ्झा शॉपमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये पिझ्झा मिळतो. यांची स्पेशलिटी म्हणजे इथे पिझ्झाचे तब्बल 30 ते 35 हुन अधिक प्रकार आहेत.
सहा महिन्यांपूर्वी अक्षता आणि तिच्या आईने म्हणजेच आसावरी यांनी मिळून हा व्यवसाय सुरू केला. या एफबीएफ पिझ्झेरियामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा चीज मार्घेरिटा, कॉर्न अँड चीज, व्हेज मिक्स्ड आणि स्पायसी व्हेज हे चार पिझ्झा फक्त 99 रुपयांना मिळतात. त्यानंतर इथे सगळ्या पिझ्झांची किंमत नॉनव्हेज आणि व्हेजमध्ये 149 रुपयांपासून सुरू होते. पिझ्झा सोबत तर इथे मिळणारा कॅल्झॉन व्हेज हा पदार्थ सुद्धा सध्या तरुणाईला आवडतोय. हा पदार्थ सुद्धा तुम्हाला फक्त 99 रुपयांमध्ये पदार्थ मिळेल. हा खूप जास्त चिझी पदार्थ असून यामध्ये सुद्धा तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज असे ऑप्शन अव्हलेबेल आहेत.
advertisement
अक्षता इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात असताना तिने सुरुवातीला याच ठिकाणी वॉफलचा व्यवसाय सुरू केला होता. पण या वॉफलच्या दुकानात फक्त संध्याकाळची गर्दी असल्याने आपण सकाळी आणि दुपारी काहीतरी वेगळा व्यवसाय सुद्धा करावा या उद्देशाने तिने आणि तिच्या आईने या पिझ्झेरीया शॉपला सुरुवात केली. यात पिझ्झेरियामध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी पिझ्झामध्ये रेड हॉट फिस्टा, टीका ट्विस्ट, व्हेजी ऑन फायर, व्हेज वोल्कॅनो, बार्बेक्यू बझ, चिकन बोनाझा असे 35 हुन अधिक प्रकार मिळतील.
advertisement
'मला इंजीनिअरिंग करता करता स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा होता. आई सुद्धा फूड इंडस्ट्रीमध्ये पूर्वी काम करत होती. वॉफलचा व्यवसाय संध्याकाळीच चालायचा कारण तो एक डेझर्टचा प्रकार होता त्यामुळे आईच्या मदतीने मी पिझ्झेरिया शॉप खोलायचा निर्णय घेतला. आणि आता याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे' असे अक्षताने सांगितले.
मित्रांनो तुम्हाला सुद्धा मालाडमध्ये फक्त 99 रुपयांना पिझ्झा खाण्याची इच्छा असेल, तर आवर्जून मालाड स्थानकापासून फक्त 20 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या चिंचोली बंदर येथील एफ बी एफ पिझ्झेरियाला नक्की भेट द्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 09, 2025 10:35 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
खवय्यांची चंगळ, पिझ्झाचे 35 हुन अधिक प्रकार एकाच ठिकाणी, किंमत फक्त 99 रुपये