advertisement

Deep Conditioning : केळं, दही, कोरफडीची किमया, केस होतील मऊशार, केसांच्या कंडिशनिंगसाठी हा उपाय करुन बघा

Last Updated:

नेहमी वापरत असलेल्या कंडिशनरसोबतच घरगुती कंडिशनर वापरल्यानं केस मऊशार होतील. केसांची काळजी घेण्यासाठी, नैसर्गिक DIY कंडिशनर बद्दल जाणून घेऊया. केळं, दही, कोरफड वापरुन नैसर्गिक कंडिशनर बनवता येतं. जाणून घ्या कृती.

News18
News18
मुंबई : हिवाळ्यातल्या आल्हाददायक हवेमुळे चांगलं वाटतं. पण कोरड्या हवेमुळे त्वचा आणि केस कोरडे होण्याचं प्रमाण वाढतं. कोरड्या केसांसाठी या ऋतूत केसांची काळजी घेण्यासाठी डीप-कंडिशनिंग करणं आवश्यक आहे.
नेहमी वापरत असलेल्या कंडिशनरसोबतच घरगुती कंडिशनर वापरल्यानं केस मऊशार होतील. केसांची काळजी घेण्यासाठी, नैसर्गिक DIY कंडिशनर बद्दल जाणून घेऊया. केळं, दही, कोरफड वापरुन नैसर्गिक कंडिशनर बनवता येतं. जाणून घ्या कृती.
केळी - केळ्यातल्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे केसांचं मॉइश्चरायझिंग चांगलं होतं. कोरड्या केसांसाठी हा उत्तम पर्याय आहे. एक पिकलेलं केळ मॅश करा आणि त्यात मध, अंडी आणि दूध मिसळा. ही पेस्ट केसांना लावा आणि तीस मिनिटं तसंच राहू द्या. नंतर शाम्पूनं धुवा. केळ्यात व्हिटॅमिन बी6, पोटॅशियम, प्रथिनं आणि इतर पोषक घटक भरपूर असतात. यामुळे टाळू आणि केसांचं खोलवर पोषण होतं.
advertisement
दही - दह्यात प्रथिनं आणि लॅक्टिक अ‍ॅसिड असतं, यामुळे केस मऊ आणि गुळगुळीत होतात. दही, केळी, मध आणि ऑलिव्ह ऑइल मिसळून पेस्ट बनवा. केसांना लावा आणि केस धुण्यापूर्वी तीस मिनिटं तसंच राहू द्या. त्यात मऊ करणारे आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत.ं
advertisement
कोरफड - कोरफड हे एक नैसर्गिक अमृत आहे, यामुळे पीएच संतुलन आणि केसांची वाढ होण्यासाठीचे आवश्यक गुणधर्म आहेत. एका भांड्यात चार चमचे कोरफड आणि थोडासा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण केसांना लावा आणि पाच ते दहा मिनिटं तसंच राहू द्या. नंतर ते शाम्पू आणि कंडिशनरनं धुवा. आठवड्यातून दोनदा ही प्रक्रिया पुन्हा करु शकता.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Deep Conditioning : केळं, दही, कोरफडीची किमया, केस होतील मऊशार, केसांच्या कंडिशनिंगसाठी हा उपाय करुन बघा
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement