Happy Bhaubeej Wishes : भावाबहिणीने एकमेकांना विश करायचं तर हटके; एकापेक्षा एक भारी भाऊबीज शुभेच्छा मेसेज
- Published by:Priya Lad
Last Updated:
Happy Bhaubeej Wishesh In Marathi : भाऊबहिणीचं नातं म्हणजे थोडा खट्टा थोडा मिठा अस असतं. त्यामुळे या नात्याचा सण भाऊबीजेसाठी सगळ्यात हटके, मजेशीर आणि खास असे भाऊबीज शुभेच्छा मेसेज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. हे शुभेच्छा मेसेज पाठवून तुमच्या भावाबहिणीची भाऊबीज आणखी खास बनवा.
दिवाळीतील पती-पत्नीच्या नात्याचा सण पाडव्यानंतर येतो तो बहीण-भावाच्या नात्याचा सण भाऊबीज. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला भाऊबीज असते. भाऊबीज हा सण बहीण आणि भावाप्रती श्रद्धा आणि प्रेमाचा सण आहे. बहिणी आपल्या भावाला ओवाळतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि संकटांमध्ये आपण सोबत असल्याचे वचन देतो. या दिवसासाठी खास शुभेच्छा मेसेज.
भाऊबीजेसाठी तुम्ही शुभेच्छा मेसेज शोधत असाल तर सगळ्यात हटके, मजेशीर आणि खास असे भाऊबीज मेसेज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. हे शुभेच्छा मेसेज पाठवून तुमच्या भावाबहिणीची भाऊबीज आणखी खास बनवा.
लहानपणी तुझ्या या भावाने तुझ्या खूप शेंड्या खेचल्या,
नेहमीच मस्करी करून तुझ्या खूप टेरही खेचल्या,
रागावू नकोस या वेड्या भावावर,
advertisement
नेहमी अशीच खूश रहा,
नेहमीच अशी माझी खरीखुरी मैत्रीण बनून रहा.
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!
------------------------------------------------
माझ्याशी रोज भांडतोस
पण दर भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी
मला हवं ते गिफ्ट नेहमी आणतोस
थँक्स भाऊ! हॅप्पी भाऊबीज!
-----------------------------------------
या दिवाळीला लक्ष्मीमातेची
कृपा तुझ्यावर बरसत राहू दे.
म्हणजे मला हवं ते
गिफ्ट तू नक्की देशील!
advertisement
हॅप्पी भाऊबीज!
---------------------------------------
भाऊ यश तुमच्या पायांचे चुंबन घेवो,
तुमच्या आजूबाजूला आनंद असो,
पण देवाला खूप प्रार्थना केल्याबद्दल,
तुम्ही मला काही कमिशन द्या…!!!
तुम्हा सर्वांना भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा !!
---------------------------------------
बहीण टिळक लावते मग मिठाई खाऊ घालते.
भाऊ भेटवस्तू देतो आणि बहीण हसते,
भाऊ-बहिणीचे हे नाते कधीच सैल होऊ नये.
advertisement
माझ्या कडून भाऊबीजच्या शुभेच्छा..!!
---------------------------------------
देवा माझा भाऊ खूप गोंडस आहे
माझ्या आईचा प्रिय माझा भाऊ आहे
देवा त्याला काही त्रास देऊ नकोस
जिथे असेल तिथे
आनंदाने आयुष्य जावे त्याचे..!!!
भाऊबीजेच्या तुम्हाला शुभेच्छा!
तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे
म्हणूनच तर मला कधीच
कोणाची भीती वाटत नाही.
तू असाच माझ्यासोबत राहा.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!!
advertisement
---------------------------------------
मला धाकात ठेवायला
तुला नेहमीच आवडतं
पण भाऊबीजेला मात्र
प्रेमाचा झरा होतोस,
भाऊबीजेच्या शुभेच्छा!
Location :
Delhi
First Published :
Oct 22, 2025 6:01 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Happy Bhaubeej Wishes : भावाबहिणीने एकमेकांना विश करायचं तर हटके; एकापेक्षा एक भारी भाऊबीज शुभेच्छा मेसेज









