पावसात अंघोळ करणे किती फायद्याचं की तोट्याचं?, अनेकांना माहिती नसेल, नेमकं काय करावं?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
पावसात अंघोळीने तुमचे शरीरच थंड होत नाही तर रॅशही ठिक होतात. नर्सिंग ऑफिसर मुकेश लोरा यांनी याबाबत माहिती दिली.
काजल मनोहर, प्रतिनिधी
जयपुर : सध्या पावसाळा सुरू झाला असून सर्वत्र पाऊस होत आहे. अनेकांना पावसात भिजायला आवडते. तसेच पावसात भिजल्यावर मग नंतर गरमागरम भजी आणि चहा मिळाला तर तो स्वर्गसुखाचा आनंद मानतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत पावसात भिजणे हे सर्वांना आवडते. पण अनेकांना माहिती नसेल की पावसात अंघोळ करण्याचे आरोग्याला आणि त्वचेला फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा पावसात भिजाल, तेव्हा घाबरू नका. तर याचा पुरेपूर आनंद घ्या.
advertisement
दिवसभरात एका व्यक्तीने किती आहार घ्यावा?, रात्रीचं जेवणं नेमकं कसं असावं?, डॉक्टरांनी सांगितली ही महत्त्वाची माहिती
पाऊस तुमच्या केसांना नॅच्युरली क्लीन करण्यास मदत करतो. पावसात भिजल्यानंतर फक्त तुम्हाला शॉवरखाली अंघोळ करायची आहे आणि तुमच्या केसांना माइल्ड शॅम्पूने धुवायचे आहे. तुम्ही यासाठी कडुनिंब असलेला शॅम्पू किंवा साबण वापरा. यानंतर तुमचे केस अधिक निरोगी होतील. पावसात अंघोळीने तुमचे शरीरच थंड होत नाही तर रॅशही ठिक होतात. नर्सिंग ऑफिसर मुकेश लोरा यांनी याबाबत माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, पावसाचे पाणी तुमच्या त्वचेच्या तापमानाला समतोल ठेवतो. यासोबत पावसात अंघोळ केल्याने तुमचे हार्मोन्स बॅलन्स होतात. हार्मोन्सला संतुलित ठेवण्यासाठी पावसाच्या पाण्यात अंघोळ करणे हे फायदेशीर ठरू शकते. यामुळे एंडोर्फिन आणि सेरोटोनिन हे हार्मोन्स शरीरातून निघतात. यामुळे तुम्ही तणावमुक्त होतात.
advertisement
पावसात भिजल्यानंतर काय करावे -
advertisement
पावसात भिजल्यावर लोकांना लोकांनी साबणाने अंघोळ करावी. यामुळे शरीरावरील धूळ-माती, घाम सर्व स्वच्छ होते. यानंतर त्वचेवर मॉइश्चरायजर लावावे. यामुळे इंफेक्शनचा धोका कमी होईल.
पावसात अंघोळ करताना अजिबात या गोष्टी करू नका -
प्रयत्न करावा की, पावसात जास्त वेळ घालवू नका. कारण असे केल्याने तुम्ही आजारी पडू शकतात. याशिवाय पावसात हवा सुरू असेल तर तुमची तब्येत खराब होऊ शकते आणि तुम्हाला तापही येऊ शकते. पावसात 10-15 मिनिटे घालवणे आणि त्यानंतर लगेचच गरम पाण्याने अंघोळ करावी. याशिवाय जास्त वेळ पाण्यात भिजल्याने यूटीआय इंफेक्शनही होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, पहिल्या पावसाच्या पाण्यात भिजणे टाळावे. कारण पहिल्या पावसात बॅक्टेरिया भरलेले असतात.
advertisement
सूचना : या बातमीत दिलेली माहिती ही तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहेत. ही सामान्य सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
view commentsLocation :
Jaipur,Rajasthan
First Published :
July 04, 2024 6:08 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
पावसात अंघोळ करणे किती फायद्याचं की तोट्याचं?, अनेकांना माहिती नसेल, नेमकं काय करावं?


