पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! तब्बल 4 महिन्यानंतर पाणचक्कीला आलं पाणी, गाईड काय म्हणाले?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
ही पाणचक्की सन 1744 मध्ये बांधण्यात आली. हसरत बाबा शहा मुसाफिर यांनी ही पाणचक्की बांधली. शहराच्या उत्तरेकडेच म्हणजे सुमारे 6 किलोमीटर अंतरावर झटवाडा डोंगर आहे.
अपूर्वा तळणीकर
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर हे पर्यटनाच्या शहर म्हणून ओळखले जाते. शहरामध्ये अनेक ऐतिहासिक अशी पर्यटनस्थळ आहेत. ही पर्यटन स्थळ बघण्यासाठी देश विदेशातून अनेक पर्यटक येत असतात. शहरातील एक पर्यटनस्थळ म्हणजे पाणचक्की. ही पाणचक्की पाहायला अनेक पर्यटक येत असतात. मात्र, काही दिवसांपासून पाणचक्कीला पाणीच नव्हते. पण आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
advertisement
गेल्या काही महिन्यांपासून पानचक्कीला पाणी नव्हतं. पण आता परत पानचक्कीला पाणी यायला लागले आहे आणि यामुळेच अनेक पर्यटक हे पाणचक्की बघण्यासाठी येत आहेत. या ठिकाणी पाण्यावरती दळण दळले जायचे. त्यामुळे पर्यटकांना हे पर्यटनस्थळ आकर्षित करते.
गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून पाणचक्कीला पाणी नव्हते. त्यामुळे कोणतेही पर्यटक ही पाणचक्की पाहायला येत नव्हते. मात्र, आता पाणी आल्याने मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र बाहेरही आणि देशाबाहेरही मोठे पर्यटक याठिकाणी येत आहेत, अशी माहिती येथील गाईड जुबेर पटेल यांनी दिली.
advertisement
मुलांच्या डब्ब्याची चिंता संपली! अशा पद्धतीने बनवू शकता झटपट आप्पे, अगदी सोपी पद्धत...
गेल्या चार-पाच महिन्यांपासून पाणी नव्हतं. त्यामुळे पाणचक्की बंद होती. विशेष म्हणजे याचं जातंही बंद होतं आणि पर्यटक खास हे जातं बघण्यासाठी येतात. पण आता पहिला पाऊस पडल्यानंतर पाणी आलं आणि गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मोठे पर्यटक याठिकाणी येत आहेत. यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे, अशी भावना गाईड आसिफ यांनी व्यक्त केली.
advertisement
असा आहे पाणचक्कीचा इतिहास -
ही पाणचक्की सन 1744 मध्ये बांधण्यात आली. हसरत बाबा शहा मुसाफिर यांनी ही पाणचक्की बांधली. शहराच्या उत्तरेकडेच म्हणजे सुमारे 6 किलोमीटर अंतरावर झटवाडा डोंगर आहे. या डोंगरातून जमिनीत जवळपास 30 फूट पर्यंत खोदकाम करून नहरीच्या माध्यमातून पाणचक्की तयार करण्यात आली. त्यानंतर पाणी 20 फूट उंचीच्या भिंतीवरून लोखंडी पंख्यावर सोडण्यात आले.
advertisement
दिवसभरात एका व्यक्तीने किती आहार घ्यावा?, रात्रीचं जेवणं नेमकं कसं असावं?, डॉक्टरांनी सांगितली ही महत्त्वाची माहिती
पंख्यांच्या लोखंडी पाथ्यावर जोराने भिंतीवरून पडणारे पाणी पंख्यांना फिरायला भाग पाडते. त्याच्यावरच्या भागांमध्ये पंख्यांवरती एक दळण दळण्याचे जातं बसवण्यात आले. त्या जात्यामध्ये धान्य टाकून त्यातून पीठ काढलं जायचं आणि यातून यात्राकरुंच्या जेवणाची व्यवस्था केली जात होती. सध्या या पाणचक्कीतून दळण दळले जात नसले तरी लोखंडी पंख आणि दगडी जाते आजही पाण्याच्या प्रवाहामुळे फिरते.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
July 04, 2024 5:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! तब्बल 4 महिन्यानंतर पाणचक्कीला आलं पाणी, गाईड काय म्हणाले?