Dragon Fruits: ड्रॅगन फ्रुटच्या नियमित सेवनाने खरंच कॅन्सर टाळता येतो? डॉक्टर काय सांगतात?

Last Updated:

Dragon Fruits Benefits: ड्रॅगन फ्रुटचे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात फायदे आहेत. कर्करोगाच्या रुग्णांनी रुग्णांनी आवर्जून ड्रॅगन फ्रुटचे सेवन करावे, असे डॉक्टर सांगतात.

+
Dragon

Dragon Fruits: ड्रॅगन फ्रुटच्या नियमित सेवनाने खरंच कॅन्सर टाळता येतो? डॉक्टर काय सांगतात?

जालना: बाजारामध्ये ड्रॅगन फ्रुट मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. ड्रॅगन फ्रुटचे सेवन नियमित केल्यास आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. विविध पौष्टिक तत्त्वांनी भरपूर असल्याने हे फळ अतिशय आरोग्यदायी आहे. ड्रॅगन फ्रुटच्या नियमित सेवनाने कॅन्सरचा धोका कमी होतो, असं देखील सांगितलं जातं. परंतु या दाव्यामध्ये किती तथ्य आहे? याबाबतच आहारतज्ज्ञ डॉ. अमृता कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊ.
ड्रॅगन फ्रुटचे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात फायदे आहेत. ड्रॅगन फ्रुटमध्ये मेटालीन नावाचा घटक असतो. मिटालीन हा हृदयाला पोषक असल्यामुळे हृदयरोगाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी ड्रॅगन फ्रुटचे सेवन करावे. तसेच या फळात भरपूर प्रमाणात फायबर असते. मधुमेह असलेल्या रुग्णांना ते फायदेशीर ठरते, असं डॉ. कुलकर्णी सांगतात.
advertisement
कॅन्सर रुग्णांना फायदा?
ड्रॅगन फ्रुटमध्ये फिनोलिक ऍसिड, फ्लायनाइड ग्लुटीन सारखे घटक असल्याने अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे कॅन्सरशी झुंज देणाऱ्या किंवा कॅन्सरपीडित रुग्णांना या फळाचा फायदा होतो. अशा रुग्णांनी आवर्जून ड्रॅगन फ्रुटचे सेवन करावे, असे डॉक्टर सांगतात.
दरम्यान, ड्रॅगन फ्रुट हे अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीने भरपूर असल्यामुळे त्वचेशी निगडित रोग दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर त्वचेवर सुरकुत्या पडण्याची समस्या देखील दूर होते. फायबर भरपूर प्रमाणात असल्याने अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांवर देखील हे फळ परिणामकारक ठरते, असं डॉ. अमृता कुलकर्णी यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
Dragon Fruits: ड्रॅगन फ्रुटच्या नियमित सेवनाने खरंच कॅन्सर टाळता येतो? डॉक्टर काय सांगतात?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement