चपाती आणि भात कधीच खाऊ नये एकत्र, मोठं दुखणं होऊ शकतं! तज्ज्ञ सांगतात...
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
चपाती आणि भात हे दोन्ही पदार्थ वेगवेगळ्या पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असतात. त्यामुळे ते ठराविक वेळीच खायला हवे.
आकांशा दीक्षित, प्रतिनिधी
नवी दिल्ली : शरीर ऊर्जावान ठेवण्यासाठी अन्नपाण्याची नितांत आवश्यकता असते, परंतु सुदृढ शरिरासाठी पौष्टिक आहार घेणं महत्त्वाचं असतं. नाहीतर शरिराला विविध आजार जडू शकतात. अनेकजण दुपारच्या जेवणात चपाती आणि भात एकत्र खातात. त्यामुळे शरिराला भरपूर पोषक तत्त्व मिळतात असं मानलं जातं. परंतु एक्स्पर्ट सांगतात की, हे दोन पदार्थ कधीच एकत्र खाऊ नये.
advertisement
डायट टू नरिशच्या फाउंडर प्रियंका जयस्वाल यांना याबाबत विचारलं असता, त्यांनी सांगितलं की, चपाती आणि भात हे दोन्ही पदार्थ वेगवेगळ्या पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असतात. त्यामुळे ते ठराविक वेळीच खायला हवे. कधीच एकत्र चपाती आणि भात खाऊ नये.
काय होऊ शकतो त्रास?
शुगर लेव्हलवर होतो परिणाम : भात आणि चपाती एकत्र खाल्ल्यानं शुगर लेव्हल वेगानं वाढू शकते. यामुळे टाइप 2 डायबिटीजचा धोका निर्माण होऊ शकतो. डायबिटीजच्या रुग्णांसाठी तर भात आणि चपाती एकत्र खाणं घातक मानलं जातं.
advertisement
अन्नपचनात बाधा : डायटिशियन प्रियंका यांनी दिलेल्या माहितीनुसार, चपाती आणि भात एकत्र खाल्ल्यानं आतड्यांमध्ये फर्मेंटेशन होतं, ज्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स वाढण्याची शक्यता असते. परिणामी अन्नपचनासंबंधित त्रास होऊ शकतो.
चरबी वाढते : चपाती आणि भात एकत्र खाल्ल्यानं शरिरात स्टार्चचं अब्जॉर्प्शन होऊ लागतं. यामुळे अन्नपचनात अडचणी येतातच, शिवाय शरिरात सूजही येऊ शकते. ज्यामुळे चरबी वाढण्याची शक्यता असते.
advertisement
सूचना : ही माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे, तरी आपण आपल्या आरोग्यासंबंधित कोणताही निर्णय घ्येण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
July 07, 2024 12:08 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
चपाती आणि भात कधीच खाऊ नये एकत्र, मोठं दुखणं होऊ शकतं! तज्ज्ञ सांगतात...