Water Fasting : वॉटर फास्टिंग म्हणजे नेमकं काय? असं केल्याने खरंच वजन कमी होत का?
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
वॉटर फास्टिंग सुरु करण्यासाठी हेल्द एक्सपर्टचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
वॉटर फास्टिंग हा उपाय सध्या वजन कमी करण्यासाठी खूप ट्रेंडमध्ये आहे. वॉटर फास्टिंग हा एक प्रकारचा उपवास असून यात पाणी पिण्याऐवजी काहीही खाल्ले जात नाही. वॉटर फास्टिंगचे अनेक फायदे आहेत असा दावा केला जातो. मात्र वॉटर फास्टिंग सुरु करण्यासाठी हेल्द एक्सपर्टचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
काय आहे वॉटर फास्टिंग : जल उपवास किंवा वॉटर फास्टिंगमध्ये अन्न सोडून सतत पाणी पिणे याचा समावेश आहे. ही फास्टिंग साधारणपणे 24 तास ते तीन दिवसांपर्यंत सुरु राहते. याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी आणि एकूणच आरोग्य चांगले राहण्यासाठी केला जातो.
advertisement
वॉटर फास्टिंग कसं सुरु करावं? : जल उपवास अधिकतर 24 ते 72 तासांपर्यंत सुरु असतो. याबाबतीत काही विशेष निर्देश देण्यात आलेले नाहीत. तसेच लोकांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता हा उपवास करायला नको.
वॉटर फास्टिंगचे फायदे : संशोधनात असे दिसून आले आहे की दीर्घकाळ वॉटर फास्टिंग केल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. वॉटर फास्टिंगमुळे एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास आणि जळजळ कमी करण्यास सुद्धा मदत होते. तसेच कॅलरीज इनटेक कमी झाल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत मिळते.
advertisement
वॉटर फास्टिंग करण्याचे तोटे : वॉटर फास्टिंगमुळे अनेकदा निर्जलीकरण ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन होऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 07, 2024 11:11 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Water Fasting : वॉटर फास्टिंग म्हणजे नेमकं काय? असं केल्याने खरंच वजन कमी होत का?