उन्हात लघवीच्या जागी जळजळ होते? डॉक्टरांनी सांगितलं नाजूक जागेचं रक्षण कसं करावं

Last Updated:

'पाणी म्हणजे जीवन' असं म्हणतात ते काही उगीच नाही. शरिरात पुरेसं पाणी नसेल तर त्याचा परिणाम त्वचेपासून किडनीपर्यंत सर्वत्र होतो.

थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावं.
थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावं.
दीपक पाण्डेय, प्रतिनिधी
खरगोन : आता प्रचंड कडाक्याचं ऊन पडतं. मार्च महिन्यातच ठिकठिकाणचा पारा 38 डिग्री सेल्सियसवर पोहोचला होता. आता तर दुपारी घरातून बाहेर पडणंही अवघड झालंय. परंतु घराबाहेर पडल्यावरच शरीर घामाघूम होतं असं नाहीये, तर घरात असतानाही जीवाची लाहीलाही होतेय. अशा स्थितीत पाण्याची पातळी कमी झाल्याने शरिराला विविध आजार जडू शकतात.
कडाक्याच्या उन्हात घामावाटे पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याने शरिरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे आत विविध अवयवांचं कार्य बिघडतं. म्हणून या काळात भरपूर पाणी पिणं, रसदार फळं खाणं अत्यंत आवश्यक आहे. थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावं. दररोज द्राक्ष, कलिंगड, संत्र, काकडी, इत्यादी हंगामी फळांचा आहारात समावेश करावा. कारण या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. ज्यामुळे घामावाटे बाहेर निघणाऱ्या शरिरातल्या पाण्याची कमतरता भरून निघते. शिवाय विविध आजारांपासून आरोग्याचं रक्षण होतं.
advertisement
पाण्याला पर्याय नाही!
डॉ. संतोष मौर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पाणी म्हणजे जीवन' असं म्हणतात ते काही उगीच नाही. शरिरात पुरेसं पाणी नसेल तर त्याचा परिणाम त्वचेपासून किडनीपर्यंत सर्वत्र होतो. त्वचेवरचा ओलावा म्हणजेच तेज निघून जातं आणि लघवीच्या जागी जळजळ जाणवते. त्यामुळे वेळच्या वेळी पाणी प्यावं, हंगामी फळं खावीच शिवाय शक्य असल्यास दररोज लिंबूपाणी प्यावं. त्यामुळे शरिरात पाण्याची कमतरता भासत नाही.
advertisement
रोगांपासून होतं संरक्षण
शरिरात पाण्याची कमतरता असेल, तर सर्वात आधी लघवीसंंबंधी त्रास होतो. हा त्रास झाल्यानंतर उपाय करण्यापेक्षा दररोज सकस आहार घेतल्याने आपल्या संपूर्ण शरिराचं रक्षण होऊ शकतं. कलिंगड, काकडी, द्राक्ष आणि संत्र्यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. ज्यामुळे केवळ लघवी व्यवस्थित होणार नाही, तर बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटीही उद्भवणार नाही.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
उन्हात लघवीच्या जागी जळजळ होते? डॉक्टरांनी सांगितलं नाजूक जागेचं रक्षण कसं करावं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement