Benefits of Haldi Amla juice: हिवाळ्यात फायद्याचं ठरेल ‘हे’ स्पेशल ड्रिंक्स; राहाल तंदुरूस्त, पडणार नाही आजारी

Last Updated:

Benefits of Haldi Amla juice: हिवाळ्यात आवळा खाणं हे फायद्याच मानलं जातं. त्यातच आपल्या घरात असलेली हळद ही अनेक रोगांवर गुणकारी मानली जाते.जाणून घेऊयात हिवाळ्यात हळदी आवळा ज्यूस पिण्याचे फायदे.

प्रतिकात्मक फोटो : हळदी आवळा ज्यूस
प्रतिकात्मक फोटो : हळदी आवळा ज्यूस
मुंबई: असं म्हणतात की पावळ्यात साथीच्या रोगांचा धोका जितका असतो तितकाच तो हिवाळ्यातसुद्धा असतो, कारण हिवाळ्यात बदलेल्या वातावरणाचा फटका अनेकांना बसतो. काही जणांना सर्दी-खोकल्यासारखा सामान्य आजार होतो, तर काही लोकांना ताप येऊन त्याचं रूपांतर न्यूमोनियामध्ये व्हावाला वेळ लागत नाही. म्हणून हिवाळ्यात प्रकृतीची काळजी घेणं क्रमप्राप्त ठरतं. आपल्याला आठवत असेल तर जुन्या काळात एकत्र कुटुंब पद्धती असताना हिवाळ्यासाठी विशेष पदार्थ बनवले जायचे. जे खाल्ल्याने घरातल्या व्यक्ती तंदुरूस्त राहून त्यांचे आजार पळून जायचे. आता एकत्र कुटुंब पद्धती कमी जरी झाली असली तरीही आम्हा तुमच्यासाठी आजीबाईच्या बटव्यातून घेऊन आलोय एक हेल्दी ड्रिंक जे प्यायल्याने हिवाळ्यात तुम्ही एकदम फिट राहाल,

जाणून घेऊयात हे ड्रिंक्स नेमकं आहे तरी काय, ते बनवायच कसं आणि त्याचे फायदे काय ?

हिवाळ्यात आवळा खाणं हे फायद्याच मानलं जातं. त्यातच आपल्या घरात असलेली हळद ही अनेक रोगांवर गुणकारी मानली जाते. आता विचार करा ही हळद आणि आवळा एकत्र करून त्याचा ज्यूस बनवला तर तो आरोग्यासाठी किती फायद्याचा ठरू शकतो. या ज्यूसमुळे फक्त तुमची रोगप्रतिकारक शक्तीच वाढणार नाहीये तर अनेक आजारही दूर पळायला मदत होणार आहे.
advertisement

जाणून घेऊयात हे ज्यूस नेमकं बनवायचं कसं ?

हिवाळ्यात शरीराला उबदार आणि मजबूत ठेवण्यासाठी पारंपरिक पेये खूप फायदेशीर असतात. त्यापैकी एक म्हणजे हळदीची पूड. हे केवळ चवदारच नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये क जीवनसत्व भरपूर असते, तर हळदीमध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. आवळा हळद कांजी हे एक नैसर्गिक प्रोबायोटिक आहे, जे पचन सुधारते आणि रोग प्रतिकारशक्ती देखील वाढवते.
advertisement

जाणून घेऊयात  हळदी-आवळ्याच्या ज्यूसचे फायदे

हळद: ‘अनेक आजारांवर उपयुक्त औषध’ असं हळदीचं वर्णन आयुर्वेदात केलंय. हळदीमध्ये दाहक-विरोधी आहेत किरकोळ आजारापासून ते हृदयरोग आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारांसाठी हळद गुणकारी आहे.
advertisement
आवळा : आवळ्यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म केवळ इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवत नाहीत तर स्थूलपणा कमी करायला मदत करतात. आवळ्यातलं क्रोमियम हे शरीरासाठी आवश्यक पोषकतत्व आहे ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होऊन डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतो.
हे सुद्धा वाचा : Amla Juice Benefits: गुणकारी आवळ्याचे आहेत इतके फायदे; 30 दिवस प्या आवळ्याचा रस दूर होतील अनेक आजार
त्यामुळे हळदी-आवळ्याचा ज्यूस एक प्रोबायोटिक पेय ठरतं  ज्यामुळे पचनशक्ती मजबूत व्हायला मदत होते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढून शरीरातून अनेक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. याशिवाय आवळा हळदीचा ज्यूस शरीराला उर्जा देऊन शरीराला आतून उबदार ठेवतो.
advertisement

हळदी आवळ्याचा ज्यूस कसा तयार करायचा ?

हळदी आवळ्याचा ज्यूस तयार करण्यासाठी 5 ते 6 आवळे, 2 हळकुंडं किंवा हळदीची पावडर, हिरव्या मिरच्या आणि 2 ग्लास पाणी लागणार आहे. आधी आवळे साफ करून धुवून घ्या, त्यांची सालं काढून त्यात  हळकुंडांचे तुकडे किंवा हळदीची पावडर टाका. 2 मिरच्या कापून त्या गरम पाण्यात उकळून घ्या. यानंतर त्यात चिमूटभर मीठ टाकून सगळं मिश्रण थंड करून ते एक बरणीत झाकण लावून 2-3 दिवस उन्हात ठेवा. यानंतर तुम्ही सकाळ संध्याकाळ हे मिश्रण जर प्यायलात तर तुमच्या शरीराला नक्कीच अनेक फायदे होतील.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Benefits of Haldi Amla juice: हिवाळ्यात फायद्याचं ठरेल ‘हे’ स्पेशल ड्रिंक्स; राहाल तंदुरूस्त, पडणार नाही आजारी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement