Monsoon Health: पावसाळ्यात पाणी आणि आहार, यांच्यामुळेच आजार, काय घ्यावी काळजी?
- Reported by:Aishwarya Ramnath Taskar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Monsoon Health: पावसाळी वातावरणात अनेक आजार डोके वर काढतात. तेव्हा आहार आणि पाण्याची योग्य ती काळजी घेण्याची गरज असते.
अहिल्यानगर: पावसाळा सुरू झाला की अनेक आजार डोकं वार काढत असतात. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे आजारी पडण्याचा धोका असतो. या काळात आरोग्य जपण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकस आहाराची गरज असते. तसेच पाणी देखील स्वच्छ पिणं गरजेचं अशतं. याबाबत अहिल्यानगर येथील डॉ. श्रुती धनेश्वर यांनी माहिती दिलीये.
पावसाळ्यामुळे सगळीकडे पाणी, चिखल साचलेला दिसतो. त्यामुळे डास आणि जंतूंचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढतो. या काळात स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे आहे. आजारी पडल्यानंतर किंवा अंगात ताप असल्यास आंघोळ करणं टाळलं जातं. पण, तसं न करता आंघोळ करणं गरजेचं आहे. आजारी असल्यावर स्वच्छता ठेवल्यास जंतू संसर्ग वाढण्याचा धोका कमी होतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते, असं डॉक्टर सांगतात.
advertisement
पाणी उकळून प्या
पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे. पाणी फिल्टरचं असलं तरीही त्याचं पूर्णपणे निर्जंतुकीकरण झालेलं नसतं. कधीकाधी त्या पाण्यातूनही संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे पाणी कुठलंही असलं तरी आपली पारंपारिक पाणी उकळून पिण्याची पद्धत फायद्याची आहे. पावसाळ्यात पाण्यातून होणारा संसर्ग त्यामुळे रोखला जातो, असं डॉक्टर सांगतात.
advertisement
कसा असावा आहार?
पावसाळ्यात बाहेरचा आहार हा टाळला पाहिजे. त्यामुळे अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं. पावसाळ्यात सकस आहार घ्यावा आणि भरपूर पाणी पिणे देखील महत्त्वाचे आहे. आहारात प्रोटीनचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. भाजीपाला, फळांचे प्रमाण अधिक असावं. बाहेरचा आहार घेतल्यास आजाराचा धोका असतो. कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेत उपचार झाल्यास आजार वाढत नाही, असंही डॉक्टर धनेश्वर सांगतात.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Jun 27, 2025 2:49 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Monsoon Health: पावसाळ्यात पाणी आणि आहार, यांच्यामुळेच आजार, काय घ्यावी काळजी?








