उन्हाळ्यात स्किन टॅन होतेय? मग ट्राय करा हे घरगुती सोपे फेसपॅक
- Published by:News18 Marathi
Last Updated:
हे फेसपॅक आपण आपल्या घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो.
अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि उन्हामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हात बाहेर पडताना स्कार्फ किंवा इतर उपाय केले जातात मात्र तरीही स्किन टॅन होणं किंवा जळजळ होणं या समस्या उद्धभवतात. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्हाला हितकारक आणि त्वचेची काळजी घेणारे काही फेसपॅक कोणते याबद्दच वर्धा येथील ब्युटीशीयन धनश्री भांडेकर यांनी माहिती दिली आहे. हे फेसपॅक आपण आपल्या घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो.
advertisement
1) लिंबू, हळद आणि खाण्याचा सोडा
लिंबूचा रस थोडी हळद आणि खाण्याचा सोडा एकत्र करून चेहरा आणि हातपायावर लावल्याने त्वचेवरील काळवटपणा दूर होण्यास मदत होते. ज्यांची त्वचा ऑयली आहे त्यांनी लिंबूचा रस डायरेक्ट वापरला तरी चालेल मात्र ज्यांची त्वचा कोरडी आहे किंवा सेन्सिटिव्ह आहे, त्यांनी लिंबूचा रस डायरेक्ट फेस वर लावू नये तर त्यात थोडं गुलाब जल किंवा गुलाबाच्या पाकळ्या कूचकरून थोडं साधं पाणी अॅड करून अप्लाय करा.
advertisement
2) बटाटा, काकडी आणि थोडी हळद
दुसऱ्या फेस पॅकमध्ये बटाटा खिसून घ्या आणि काकडी खिसून घ्या त्याचं पाणी आपल्या त्वचेसाठी भरपूर फायदेशीर आहे. या पाण्यामध्ये थोडं बेसन आणि थोडी हळद घालून हा फेसपॅक चेहऱ्यावर आणि हात, पाय, मानावर लावता येईल. ऑईली आणि ड्राय दोन्ही त्वचा प्रकारांसाठी हा पॅक फायदेशीर ठरतो.
advertisement
3) कढी पत्ता, कडुलिंब, भिजवलेल्या तांदूळची पेस्ट, लिंबू
कढीपत्ता, कडुलिंब, तांदूळ भिजवून त्याची पेस्ट आणि लिंबूचा 2-3 थेंब रस एकत्रित करून त्वचेवर लावल्याने टॅनिंग तर दूर होतेच. सोबतच त्वचेची रोमच्छिद्र ओपन होते आणि स्किन खूप सुंदर दिसायला लागते. यामुळे उन्हामुळे त्वचेवर आलेले पुरळ किंवा घामोळ्या किंवा सुटलेली खाज हे सगळे समस्या दूर होतात. हा उपाय शक्यतो रात्री झोपण्या आधी केल्यास चांगला फायदा जाणवू शकतो. कारण रात्री त्वचा आणि बॉडी रिलॅक्स असते.
advertisement
पोटाचा घेर वाढतोय? वजनवाढ ठरू शकते धोकादायक, पाहा काय काळजी घ्यावी? Video
तर अशाप्रकारे हे सर्व पॅक अतिशय हितकारक असून चेहऱ्यासह हातपायावर आलेलं टॅनिंग देखील दूर होण्यास मदत होऊ शकते, अशी माहिती ब्युटीशीयन धनश्री भांडेकर यांनी दिली.
Location :
Wardha,Wardha,Maharashtra
First Published :
Feb 27, 2024 11:36 AM IST








