पोटाचा घेर वाढतोय? वजनवाढ ठरू शकते धोकादायक, पाहा काय काळजी घ्यावी? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
भारतात सध्या 101 मिलीअन भारतीय लोकांना मधुमेह आहे. तर, 136 मिलीअन लोकांना प्रीडायबेटीस आहे.
मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
मुंबई: सध्या मधुमेह म्हणजे डायबेटीस हा आजार अगदी तिशीतल्या तरुण-तरुणींनाही होताना पाहायला मिळतो. स्थूलता, पोटाचा वाढलेला घेर, शरीरात वाढलेली चरबीची पातळी ही डायबेटीसची लक्षण असू शकतात. तर, जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळेही टाईप 2 मधुमेहाचा धोका संभवतो. तसेच ताणतणाव, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि लठ्ठपणा या तिन्ही गोष्टी मधुमेहासाठी जबाबदार आहेत. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनाही मधुमेहाचा धोका असतो. त्यामुळे प्रत्येकानं जीवनशैलीतील चुकांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या संदर्भात मुंबईतील एंडोक्राइनोलॉजिस्ट, डायबेटोलॉजिस्ट तथा वैद्यकीय संशोधक डॉ. शशांक जोशी यांनी अधिक माहिती दिली आहे.
advertisement
डॉक्टर जोशी म्हणतात की, "सगळ्यात जास्त मधुमेहाचं प्रमाण भारतात आहे. मधुमेहाचं निदान लवकर होणं गरजेच आहे. नाहीतर पुढच्या अनेक अडचणी वाढू शकतात. त्यामुळे जर वजन वाढत असेल किंवा काही वेगळी लक्षणं जाणवत असतील तर त्यांनी वैद्यकिय सल्ल्यानुसार योग्य त्या चाचण्या करून घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. तसेच लठ्ठपणाचा मधुमेहाशीही संबंध आहे. त्यामुळे बाहेरील खाद्यपदार्थ जसे की, प्रक्रिया केलेले अन्न आणि जंक फूडपासून थोड्याफार प्रमाणात दूर राहावं, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
advertisement
भारतील लोकांमध्ये मधुमेहाचं प्रमाण किती?
"भारतात सध्या 101 मिलीअन भारतीय लोकांना मधुमेह आहे. तर, 136 मिलीअन लोकांना प्रीडायबेटीस आहे. जगात मधुमेहाचं सगळ्यात जास्त प्रमाण हे भारतात आहे," असे डॉक्टर शशांक जोशी यांनी सांगितले.
मधुमेह होण्याची कारणं किंवा लक्षणं
अनुवंशिकता- तुमच्या घरात जर कोणाला मधुमेह असेल म्हणजे आई-वडिलांना, आजी-आजोबांन कोणत्याही नातेवाईकांना. तर त्याची लक्षणं ही पुढील पिढीपर्यंत नक्कीच जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला वय वर्ष 20 नंतर मधुमेहाची चाचणी करणं गरजेचं आहे.
advertisement
पोटाचा वाढता घेर- पोटाच्या वाढत्या घेरावरूनही मधुमेह असण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे महिलांमध्ये 80 सेंमीच्या वर पोटाचा घेर असेल किंवा पुरुषांमध्ये 90 सेंमीच्या वर पोटाचा घेर असेल तर त्यांनी मधुमेहाची चाचणी करणं आवश्यक आहे.
काय काळजी घ्यावी ?
शरीरातील साखरेची पातळी वाढणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी जंक फूड, बाहेरचं सतत खाणं टाळलं पाहिजे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून CGP किंवा CGM द्वारे आपण साखरेचं प्रमाण कळू शकते. त्यावरून हे नक्कीच समजू शकतं की किती प्रमाणात आपण साखरेचं प्रमाण किंवा गोडाचं प्रमाण आपल्या आहारात ठेऊ शकतो. तसेच व्यायाम, किमान 6 ते 7 तास पूर्ण झोप, योगा या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. डॉक्टरांकडून सुरु असलेली औषध आणि पथ्य पाळणेही महत्त्वाचं आहे. मधुमेह म्हटलं की सगळ्यांनाच फार चिंता जाणवू लागते. पण त्या आजारावर योग्य ते उपचार घेतले आणि काही प्रमाणात जीवनशैली बदलली तर नक्कीच हा आजार आटोक्यात आणणं शक्य आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 26, 2024 4:40 PM IST









